Video : सपना चौधरीचा डान्स यु ट्यूबवर ट्रेंड; आतापर्यंत ७ कोटी प्रेक्षकांनी पाहिला

Video : सपना चौधरीचा डान्स यु ट्यूबवर ट्रेंड; आतापर्यंत ७ कोटी प्रेक्षकांनी पाहिला

सपना चौधरीच्या 'या' डान्स व्हिडिओवर नेटकरी फिदा

हरियाणाची डान्स क्विन सपना चौधरी पुन्हा एकदा यु ट्यूबवर ट्रेंड होत आहे. तिचा एक डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून आतापर्यंत हा यु ट्यूबवर ७ कोटींहून जास्त लोकांनी पाहिला आहे. आपल्या बिनधास्त आणि आकर्षक डान्सने प्रेक्षकांना घायाळ करणारी सपना चौधरी सोशल मीडियावरही लोकप्रिया आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून त्यांचा स्टेज परफॉर्मन्स झालेला नाही. अशातच त्यांचा एक जुना व्हिडिओ यु ट्यूबवर तुफान चालत आहे.

हवा कसूत्ती, गाण्यावर डान्स

‘हवा कसूत्ती’, या हरयाणवी गाण्यावर सपना चौधरीने डान्स केला आहे. हा व्हिडिओ यु ट्यूबवर लोकप्रिय होत आहे. ‘आशिक के दिल की रै तू दवा कसूत्ती सै, माहरे गाम मैं मरजाणी तेरी हवा कसूत्ती सै’, असे या गाण्याचे बोल आहेत. नारंगी रंगाच्या पंजाबी सूटवर सपना चौधरीने जोरदार ठुमके या गाण्यावर लगावले आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत ७ कोटी २३ लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. या गाण्याला ७ कोटीपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. तसेच अजूनही डान्सला पसंती वाढत आहे. हे गाण राजू पंजाबी आणि अनू कादयान यांनी गायले आहे. तर अँडी दाहिया यांनी याचे बोल लिहिल आहेत.

हा आहे व्हायरल व्हिडिओ –

First Published on: July 13, 2020 8:11 PM
Exit mobile version