सपना चौधरीच्या गाडीला अपघात

सपना चौधरीच्या गाडीला अपघात

डान्सर सपना चौधरी

हरियाणामधील सुप्रसिद्ध गायिका आणि डान्सर सपना चौधरीच्या गाडीला अपघात झाला. या रस्ते अपघातात सपना चौधरी थोडक्यात वाचली आहे. गुरूवारी रात्री खरेदी करून सपना परतत असताना सपनाच्या गाडीला भरधाव कारने टक्कर दिली. पण सुदैवाने सपना आणि कार चालक वाचला आहे.

मात्र अद्याप सपनाने पोलिसात तक्रार दाखल केलेली नाही. कारची टक्कर झाल्यानंतर सपनाच्या गाडी चालकाने गाडी थांबवली पण दुसऱ्या गाडीचा चालक तेथून फरार झाला. त्यामुळे गाडीचा नंबर आणि गाडीचा चालक कोण आहे अद्याप कळालेले नाही. या अपघातामध्ये सपनाच्या गाडीचे नुकसान झाले आहे. सपनाने तक्रार केल्यानंतर पोलिस या अपघाताचा तपास सुरू करतील.

काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीने भाजपमध्येच प्रवेश केला. नवी दिल्लीतील जवाहर लाल नेहरू स्टेडियमध्ये भाजपच्या सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सपना चौधरी आपल्या चाहत्यांसाठी सोशलमिडीयावर अॅक्टीव्ह असते. ती तीचे बोल्ड फोटो, व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर करते.

First Published on: December 28, 2019 1:59 PM
Exit mobile version