साडीमध्ये सपना चौधरीने केले बोल्ड फोटोशूट

साडीमध्ये सपना चौधरीने केले बोल्ड फोटोशूट

देसी क्वीन म्हणून लोकप्रिय असलेली सपना चौधरी गेल्या काही दिवसांपुर्वी तिच्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होणाऱ्या डान्स व्हिडिओमुळे चर्चेत आली होती. आता पुन्हा एकदा सपना चर्चेचा विषय ठरली आहे. आता ती चर्चेत येण्याचं कारण तिचा कोणता डान्स व्हिडिओ नाही तर तिने नुकतेच केलेले साडीतील बोल्ड फोटोशू्ट.

हरियाणवी डान्सर सपना चौधरी सोशल मीडियावर अधिक सक्रिय असते. सपना तिचे नवीन फोटो तसेच व्हिडिओ नेहमीच इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. काही वर्षांपुर्वींची सपना आता खूपच ग्लॅमरस झाल्याचे पाहायला मिळते आहे.


सपना चौधरीच्या ‘या’ डान्स व्हिडिओवर नेटकरी फिदा

नुकताच तिने तिचा साडीतला बोल्ड लूक असणारा फोटो आपल्या चाहत्यांसह शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना तिने ‘कुड़िए नी तेरे, ब्राउन रंग ने.. मुंडे पट ते नी सारे मेरे टाउन दे’ या पंजाबी गाण्याच्या ओळी कॅप्शन दिल्या आहेत. ब्राऊन रंगाची प्लेन साडी आणि सिल्वर रंगाच्या ब्लाऊजमधील तिचा हा अंदाज काहिसा हटका असल्याने चाहत्यांनी त्यावर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

First Published on: October 11, 2019 4:01 PM
Exit mobile version