सपना चौधरीच्या वर्कआउटचा व्हिडीओ व्हायरल!

सपना चौधरीच्या वर्कआउटचा व्हिडीओ व्हायरल!

आपल्या नृत्यकलेने थोड्याच कालावधीत लोकांना वेड लावणारी डान्सर सपना चौधरी हिने तिचा वर्कआउट करतानाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आतापर्यंत सपना सोशल मीडियावर तिच्या नृत्याचे व्हिडीओ, फोटो शेअर करत असे. सपनाच्या व्हिडीओंना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंत करण्यात येते. पण आता तिच्या वर्कआउटचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

जेवढ्या मनापासून सपना चौधरी डान्स करते. तेवढ्याच मनापासून ती या व्हिडीओमध्ये वर्कआउट करताना दिसत आहे. सपनाला तिच्या शारीरिक आरोग्याची काळजी असून यासाठी ती खूपवेळ जिममध्ये वेळ घालवते. असाच एक वर्कआउटचा व्हिडीओ सपनाने शेअर केला आहे. हा एक मिनिटाचा व्हिडीओ आहे. व्हिडीओ शेअर करताना सपनाने लिहिले की, “राम राम इंडिया.. मी कोणी सुपर वुमन नाही. खाण्यावर माझे खूप प्रेम आहे. त्यामुळे वर्कआउटवरसुद्धा तेवढेच प्रेम मला करावे लागणार.

First Published on: November 20, 2019 7:52 PM
Exit mobile version