#BeRelentless: यशासाठी अथक परिश्रमच गरजेचे – साकीब सलीम

#BeRelentless: यशासाठी अथक परिश्रमच गरजेचे – साकीब सलीम

अभिनेता साकीब सलीम (सौजन्य - इन्स्टाग्राम)

परिश्रम न घेता लवकरात लवकर यश मिळवण्यामागे बरेच लोक धावत असतात. पण अथक परिश्रम घेऊनच यशाची चव चाखता येते. काही न मिळाल्यामुळं आजकालचे तरूण तणावाखाली येऊन आत्महत्या करतात. अशा तरूणांनी प्रेरणा घेऊन यश मिळवण्यासाठी अथक परिश्रम करायला हवेत. डिप्रेशन, ताणतणाव याबद्दल बॉलीवूडमधीलदेखील अनेक मंडळींनी आवाज सध्या उठवायला सुरुवात केली आहे. यापूर्वी दीपिकानंदेखील आपली मतं मांडली आहेत. आता यामध्ये भर पडली आहे ती अभिनेता साकीब सलीमची. यश मिळवण्यासाठी अथक परिश्रम करत राहणं गरजेचं असल्याचं त्यानं युट्यूबला एक व्हिडिओ पोस्ट करून म्हटलं आहे.

काय आहे या व्हिडिओत?

साकीब सलीमनं खूप कमी कालावधीत बॉलीवूडमध्ये स्वतःचं नाव कमावलं आहे. अभिनेत्री हुमा कुरेशीचा भाऊ ही ओळख न राहता त्याची अशी स्वतःची ओळख त्यानं निर्माण केली. त्यासाठी लागणारे सगळे कष्ट आणि परिश्रम करण्याची तयारी त्यानं यामध्ये दाखविली आहे. यश मिळवण्यासाठी कोणताही चुकीचा मार्ग न अवलंबता सतत प्रयत्न करत राहिल्याचं त्यानं सांगितलं. कधीही मागे न हटता अपयशाला यशात बदलण्यात साकीब यशस्वी झाला. स्वतःच प्रेरणा घेतल्याशिवाय यश मिळत नसतं हे व्हिडिओमधून साकीबनं तरूणांना सांगितलं आहे. #BeRelentless असं या व्हिडिओला साकीबनं नाव दिलं आहे. Never Give up and #BeRelentlesss असा मेसेज या व्हिडिओमधून साकीबनं दिला आहे. अथक परिश्रम हीच यशाची गुरुकिल्ली असल्याचं त्यानं यातून सांगितलं आहे.

साकीबचा सलमान खानबरोबरचा ‘रेस ३’ सध्या चर्चेत आहे. शिवाय साकीबने आतापर्यंत बऱ्याच जाहिरातीमध्ये काम केलं असून जाहिरात क्षेत्रामधील साकीब हा प्रसिद्ध चेहरा आहे.

First Published on: June 20, 2018 3:01 PM
Exit mobile version