साराने साजरा केला २५ वर्ष छोट्या भावाचा बर्थ डे ! चारही भावंडांनी उडवली धम्माल

साराने साजरा केला २५ वर्ष छोट्या भावाचा बर्थ डे ! चारही भावंडांनी उडवली धम्माल

साराने साजरा केला २५ वर्ष छोट्या भावाचा बर्थ डे ! चारही भावंडांनी उडवली धम्माल

 Saif Kareena Baby Jeh First Birthday : पतौडी कुटुंबाने सोमवारी करिना कपूर आणि सैफ अली खानच्या छोट्या मुलाचा म्हणजेच जेहचा पहिला वाढदिवस साजरा केला. जेहचा पहिला वाढदिवस सैफ करिनाने त्यांच्या घरीच संपूर्ण कुटुंबासोबत साजरा केला. जेहच्या वाढदिवसाला सैफ अली खानच्या चारही मुलांनी एकत्र धम्माल केली. साराने तिच्या इन्स्टाग्रामवर जेहसोबतचे काही फोटो शेअर करत त्याला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.

करीनाने देखील जेहच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलेत. ज्यात करीना, सारा, इब्राहिम, तैमूर, जेह,सैफचा परफेक्ट फॅमिली फोटो शेअर केला आहे.

‘हॅप्पीएस्ट फर्स्ट बर्थ डे बेबी जे’, असे म्हणत साराने जेहला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. एका फोटोमध्ये सारा, इब्राहिम,जेह,तैमूर आणि सैफ यांचा फॅमिली फोटो आहे. तर दुसऱ्या फोटमध्ये सारा आणि इब्राहिम जेह सोबत मस्ती करताना दिसतेय. तिसऱ्या फोटोमध्ये सारा आपल्यापेक्षा २५ वर्षांनी लहान असलेल्या आपल्या भावाला म्हणजेच जेहला जेवण भरवताना दिसत आहे. त्याचा हा फोटो पाहून चाहत्यांनी दोघांवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

साराने जेह आणि तैमूर सोबत खूप मस्ती केली आहे. एकंदरीतच जेहचा वाढदिवस संपूर्ण पतौडी कुटुंबानी एकत्र येऊन साजरा केला. २१ फेब्रुवारी २०२१ला करिना आणि सैफला दुसरा मुलगा झाला. दोघांनी जेहला लाइमलाइटपासून फार दूर ठेवले आहे. जेहहा सैफ अली खानची कार्बन कॉपी असल्याचे आजवर अनेकांनी म्हटले आहे.

जेहची धाकटी आत्या सोहा अली खाननेही त्याचा एक क्यूट व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जेह डान्स करताना दिसतोय. तर आजूबाजूला बसलेले सर्वजण टाळ्या वाजवत आहेत. सोहाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘काय? हा माझा पहिला वाढदिवस आहे. #Happy birthday जेह बाबा.’  सोहाने शेअर केला जेहचा एक क्यूट व्हिडिओ


हेही वाचा –  Saif Ali Khan ची कार्बन कॉपी मुलगा jeh; बहीण saba Ali Khan ने शेअर केला फोटो

First Published on: February 22, 2022 11:39 AM
Exit mobile version