Video: तैमूरची मोठी बहिण सारा अली खानने घेतलं नव्या पाहूण्यासाठी Special Gift!

Video: तैमूरची मोठी बहिण सारा अली खानने घेतलं नव्या पाहूण्यासाठी Special Gift!

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्य़ा नवाब कुटुंबात काही दिवसांपूर्वीच एका चिमुकल्या पाहुण्याचा जन्म झाला. बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान आता त्या छोट्या पाहुण्याला त्यांच्या घरी घेऊन आले आहेत. संपूर्ण बॉलिवूड या जोडप्यास खूप शुभेच्छा देत असून तैमूरचा धाकटा भाऊ पाहण्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या घरी हजेरी लावली. सोशल मीडियावर आता एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सारा अली खान तिच्या धाकट्या भावाला भेटण्यासाठी सैफ अली खानच्या घरी पोहोचली आहे. विशेष म्हणजे करीनाच्या बाळाचा जन्म होण्यापूर्वीच अनेक चाहत्यांनी या बाळासाठी खास गिफ्ट पाठवल्याचे पाहायला मिळाले होते. यामध्ये अभिनेत्री सारा अली खानने करीना आणि बाळासाठी खास गिफ्ट घेतल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे.

अभिनेत्री सारा अली खानचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. हा व्हिडीओ विरल भैय्यानी यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.ज्यामध्ये ती कारमधून खाली उतरते आणि आपल्या हातात काही बॅग घेताना दिसतेय. या व्हिडिओमध्ये सारा अली खानने ग्रीन शॉर्ट जम्पसूट घातल्याचे दिसतंय. हा व्हिडिओ आतापर्यंत ४० हजार पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे.

२१ फेब्रुवारी रोजी सकाळी करीना कपूर खानने तिच्या दुसर्‍या मुलाला जन्म दिला. मात्र अद्याप त्याचे कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ शेअर करण्यात आलेले दिसत नाही. दरम्यान, सारा अली खान आणि तैमुर या दोघांमध्येही चांगली मैत्री असल्याचे कित्येकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसून आले आहे. तर करीना आणि सारा या दोघींमध्ये चांगली मैत्री आहे.

First Published on: February 26, 2021 9:10 AM
Exit mobile version