मालदीवच्या बीचवर बिकनीमध्ये एन्जॉय करताना दिसली सारा; नेटिझन्स फिदा

मालदीवच्या बीचवर बिकनीमध्ये एन्जॉय करताना दिसली सारा; नेटिझन्स फिदा

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या मालदीव येथे तिच्या कुटुंबासह एन्जॉय करत आहे. सारा जेव्हा मालदीवमध्ये पोहोचली तेव्हापासून ती तिच्या चाहत्यांसाठी व्हिडिओ आणि फोटो शेअर करत आहे. चाहत्यांसाठी कनेक्ट राहण्यासाठी सारा मालदीवचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना सोशल मीडियावर दिसतेय. नुकतेच साराने तिचे मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावरील काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. त्यात ती खूपच सुंदर आणि हॉट दिसत असल्याने तिने तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. साराने तिचे बिकनीमधील हॉट फोटो शेअर केल्याने सोशल मीडियावर साराच्या या हॉट लूकची चांगलीच चर्चा होत आहे.

मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावरील साराच्या लूकला नेटिझन्सने पसंती दिली असून त्यावर चाहत्यांच्या लाईक्सचा पाऊस पडताना दिसतंय. साराने हे फोटो शेअर करताना ‘वरती आकाश आणि खाली वाळू’ असे कॅप्शन देखील दिले आहेत. आपल्या कुटुंबासह मालदीवमध्ये वेकेशन एन्जॉय करत असताना सारा अली खान सायकलिंग करताना देखील दिसली होती. याचा व्हिडिओ साराने इन्स्टाग्रामवर देखील शेअर केला होता.

First Published on: January 24, 2021 3:09 PM
Exit mobile version