सारा अली खानचा ड्रायव्हर कोरोना पॉझिटिव्ह; खान कुटुंबाने केली कोरोना चाचणी

सारा अली खानचा ड्रायव्हर कोरोना पॉझिटिव्ह; खान कुटुंबाने केली कोरोना चाचणी

कोरोना विषाणू चित्रपटसृष्टीत देखील आता पसरत आहे. अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. कलाकारांचे स्टाफ मेंबर्स देखील कोरोनाची लागण झाली आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह अभिषेक बच्चन, ऐश्वर्या बच्चन आणि आराध्यालाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. आता सारा अली खानच्या ड्राईव्हरला देखील कोरोनाची लागण झाली आहे. याची माहिती स्वत: सारा अली खानने दिली आहे. ड्राईव्हरला क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवण्यात आलं आहे. रात्री उशिरा सारा अली खानने एका इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

??????

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

“मला सांगायचं आहे की आमच्या ड्रायव्हरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत पालिकेला कळवण्यात आलं आहे. ड्रायव्हरला क्वारंटाईन सेंटरवरमध्ये पाठवण्यात आलं आहे. माझ्या कुटुंबातील सदस्यांचे आणि घरातल्या सर्व कर्मचार्‍यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आम्ही सर्वजण आवश्यक खबरदारी घेत आहोत. पालिकेच्या मदतीबद्दल आणि मार्गदर्शक तत्त्वांसाठी धन्यवाद,” असं साराने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.-

First Published on: July 14, 2020 7:54 AM
Exit mobile version