सैफ’गर्ल’ सारा खानची बॉलिवूडमध्ये एंट्री

सैफ’गर्ल’ सारा खानची बॉलिवूडमध्ये एंट्री

सैफ अली खान आणि सारा अली खान

अमृतासिंग आणि सैफ अली खान यांची मुलगी सारा अली खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. सारा अली खान ‘केदारनाथ’ चित्रपटात सुशांत सिंग राजपूत सोबत बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार. केदारनाथ चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक कपूर आणि निर्माती प्रेरणा अरोरा यांच्यात वाद झाल्यामुळे चित्रपट बारगळला होता. आता हा वाद मिटला असून या चित्रपटाची वाट मोकळी झाली आहे. हा चित्रपट या वर्षअखेरीस ३० नोव्हेंबरला प्रेक्षकासमोर येतोय. आपल्या पहिल्याच चित्रपटासाठी मेहनत करतेवेळी साराच्या वाट्याला आणखी एक बिग बजेट चित्रपट आला, तो म्हणजे ‘सिम्बा’. रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि करण जोहर सहदिग्दर्शित या चित्रपटात सारा असणं ही तिच्या करिअरच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाची बाब आहे.

रोहित शेट्टी दिग्दर्शित, ‘सिम्बा’ हा दक्षिणात्य चित्रपट ‘टेंपर’चा रीमेक आहे. या चित्रपटात सारा रणवीर सिंग सोबत असणार आहे. रणवीर एका भ्रष्ट पोलीसाची भूमिका साकारत असून तो एका सुंदर आणि साध्या मुलीच्या प्रेमात पडतो, असे कथानक असल्याची माहिती मिळत आहे. दंबग, राजकुमार राव या चित्रपटात निगेटिव्ह रोलसाठी ओळखला गेलेला सोनू सूद सिम्बातही आहे. डिसेंबर २०१८ पर्यंत सिम्बा बॉक्सऑफिसवर दाखल होईल, अशी शक्यता आहे.
या चित्रपटासाठी साराची निवड होण्यामागे एका महत्त्वाच्या व्यक्तीचं नावही जोडलं जात आहे. ती व्यक्ती म्हणजे दुसरं तिसरं कुणी नसून खुद्द सैफ अली खान. सैफनेच याविषयीचा खुलासा माध्यमांबरोबर बोलताना केला.

पिता सैफला साराची काळजी
ज्यावेळी ‘केदारनाथ’ चित्रपटाचा वाद सर्वांसमोर आला होता, त्यावेळी आपण प्रचंड चिंतेत असल्याचं सेफनं यावेळी स्पष्ट केलं. सारासाठी सर्व गोष्टी अधिक सुकर व्हाव्यात, तिला कोणत्याही गोष्टीचा त्रास होऊ नये, यासाठीच तो प्रयत्नशील कायमच असतो. किंबहुना करण जोहरच्या निर्मितीत साकारणाऱ्या ‘सिम्बा’ या चित्रपटातही साराची निवड व्हावी यासाठी तो लक्ष देऊन होता.सध्याच्या घडीला साराकडे दोन मोठे चित्रपट असल्याने तो आनंदी आहे. एक पिता म्हणून त्याला साराची वाटणारी काळजी आणि त्या दृष्टीने तो उचलत असणारी पावलं या सर्व गोष्टी सध्या त्याच्या चाहत्यांची मनं जिंकत आहेत.

First Published on: May 22, 2018 10:34 AM
Exit mobile version