माझ्या देशातील लोकं मरत आहेत म्हणत, प्रियांका – निक उतरले कोरोनाविरोधी लढ्यात

माझ्या देशातील लोकं मरत आहेत म्हणत, प्रियांका – निक उतरले कोरोनाविरोधी लढ्यात

माझ्या देशातील लोकं मरत आहेत म्हणत, प्रियांका - निक उतरले कोरोनाविरोधी लढ्यात

कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोना व्हायरसची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. अपुर्‍या  सोयी सुवीधे अभावी अनेक रुग्ण दगावत आहेत. अशातच अनेक बॉलिवूड कलाकारांनी मदतीचा हात पुढे केला आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस या दोघांनी मिळून भारतातील नागरिकांची मदत करण्याच्या निर्णय घेतला आहे. सध्या प्रियांका निक सोबत परदेशात आहे. एका एनजीओ तर्फे दोघांनी कोरोनाग्रस्त लोकांची मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. प्रियांकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती दिली आहे. तसेच या कठीण काळात लोकांना व्हायरस पासून लढण्यासाठी प्रियांका  प्रोत्साहित करत आहे. प्रियांकाने पोस्ट मध्ये लिहलं आहे की,” भारत.. माझं घर यावेळेस करोना व्हायरसच्या प्रकोपाणे झुंझत आहे. आणि आपल्या सर्वांना मदत कराची गरज आहे. जागोजागी कोरोनाचा प्रसार वाढत चालला आहे. लोकं मरत आहे. मी आणि निक आम्ही दोघांनी मिळून कोव्हिड रिलीफ फंडसाठी मदत केली आहे. तुम्ही सुद्धा आमच्या सोबत मदतीसाठी पुढे या आपल्या सर्वांना कोरोना व्हायरसशी दोन हात करावे लागतील” अशी भली मोठी पोस्ट टाकून प्रियांकाने लोकांना सुरक्षित राहण्यासाठी तसेच लोकांची मदत करण्याचे आवाहन केले आहे.


कोरोना व्हायरसने सध्या रौद्र रूप धरण केले असून, बॉलिवूड मधील अनेक कलाकार लोकांच्या मदतीसाठी धावून येत आहे. नुकतच अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना दोघांनी मिळून 100 ऑक्सिजन कन्स्ट्रेटर्स दान करणायचा निर्णय घेतला होता आणि काही दिवसांपूर्वी अक्षयने गौतम गंभीर याच्या संस्थेला गरजू लोकांच्या मदतीसाठी 1 कोटी रुपयांची मदत केली होती.


हे हि वाचा – नागडे राजकारणी,नागडं सरकार,नागडा देश,अरे हाड आम्ही प्रश्न विचारणार.. अस्ताद काळेने सरकारला सुनावले खडेबोल

First Published on: April 29, 2021 1:07 PM
Exit mobile version