स्टार किड्समध्ये तैमूर पेक्षा सारा अली खान वरचढ

स्टार किड्समध्ये तैमूर पेक्षा सारा अली खान वरचढ

स्टार किट्स सारा अली आणि तैमूर अली खान

सेलिब्रिटींचे मुलं ‘स्टार किड्स’ म्हणून सोशल मिडियावर सातत्याने चर्चेत असतात. वेगवेगळ्या सोशल साईट्सवर हे स्टार किड्स चाहत्यांच्या नजरेत पडत असतात आणि ते त्यांच्या पसंतीत उतरत असतात. श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर या स्टार किड्सनंतर सध्या चर्चेत असणाऱ्या सारा अली खान आणि तैमूर हे सोशल मिडियाचे लाडके स्टार किड्स बनले आहेत. करीना आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूर अली खान त्याच्या जन्मापासूच चाहत्यांचा लाडका आहे. तसेच अमृता सिंह आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खान ही काही महिन्यांपासून चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.

सारा अली खान प्रेक्षकांच्या पसंतीत

सारा अली खानच्या बॉलिवूड डेब्यूमुळे सोशल मिडियावर ती चर्चेत आहे. ‘सिंबा’ चित्रपटाच्या यशामुळे बॉलीवुडच्या सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत गणली जात आहे. तसेच तैमूरही त्याच्या सोशल मिडियावर अॅक्टीव्ह असल्यामुळे तो ही सातत्याने चर्चेत राहिला आहे. ‘टॉक ऑफ दि टाऊन स्टार किड्स’च्या लोकप्रियतेची तूलना ‘स्कोर ट्रेंड्स इंडिया’ने केल्यावर जी आकडेवारी समोर आली आहे त्यानूसार, डिजिटल न्यूज, न्यूजपेपर आणि वायरल न्यूजमध्ये १०० गुणांसह सारा अली खान पूढे आहे. तर ‘बेबी तैमूर’ने डिजिटल न्यूजमध्ये केवळ ४ टक्के, न्यूजपेपर कव्हरेजमध्ये १२ टक्के आणि व्हायरल न्यूजमध्ये ४२ टक्के गुण मिळवलेले आहेत.

“तैमूर अली खानची व्हायरल न्यूजमध्ये मजबूत पकड आहे. तो एकुलता एक स्टारकिड आहे, ज्याच्या घराबाहेर त्याच्या एक फोटोसाठी कित्येक तास मीडिया ताटकळत उभी असते. आणि त्याचा एक फोटो इंटरनेटवर आल्यावर मिळाणाऱ्या लाईक्सची संख्या लाखांमध्ये जाते. पण तैमूर आपल्या अॅपिअरन्सच्याशिवाय न्यूजमध्ये नाही. पण त्याची मोठी बहिण सारा आपल्या डिसेंबरमध्ये रिलीज झालेल्या दोन्ही फिल्म्समूळे न्यूजप्रिंट, डिजीटल न्यूज आणि सोशल मिडीयावर सर्वत्र आहे. तिचे इंटर्व्ह्यूज, अवॉर्ड फंक्शनमधला प्रेजेंस, बॉलीवूड मॅग्झिनच्या कव्हरपेजवर सध्दा ती झळकल्याने, तिच्याविषयीच्या बातम्या सातत्याने येत असतात.”
-अश्वनी कौल, स्कोर ट्रेंड्स इंडियाचे सहसंस्थापक

 

‘आम्ही १४ भारतीय भाषांमधील ६०० पेक्षा अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक अल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवुड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो’, असे अश्र्वीनी कौल यांनी म्हंटले आहे.

First Published on: February 4, 2019 10:39 PM
Exit mobile version