‘पाँडीचेरी’ च्या पोस्टरमध्ये अमृताची खास झलक

‘पाँडीचेरी’ च्या  पोस्टरमध्ये अमृताची खास झलक

अमृता खानविलकर

मोबाईलचा वापर करून एक संपूर्ण चित्रपट तयार होऊ शकतो. याच उत्तम उदाहरण म्हणजे ‘पाँडीचेरी’ हा चित्रपट. हा संपूर्ण चित्रपट आयफोनवर शूट केला गेला आहे. १ फेब्रुवारीपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली, या चित्रपटाच दुसरं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

काय आहे दुसऱ्या पोस्टरमध्ये

पाँडेचरीच्या दुसऱ्या पोस्टरमध्ये वैभव तत्ववादीबरोबर अभिनेत्री अमृता खानविलकर दिसत आहे. त्याचबरोबर बालकलाकार तन्मय कुलकर्णीही दिसत आहे. नेहमीप्रमाणेच अमृता या पोस्टरमध्ये सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहे.

शुटींगच्या आधीच पहिलं पोस्टर

पाँडीचेरी या चित्रपटाचे चित्रीकरण पाँडीचेरीमध्ये करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे चित्रपटाच्या चित्रीकरणाआधीच चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रेक्षकांसमोर आलं आहे. या पहिल्या पोस्टरमध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता वैभव तत्ववादी यांचा वेगळा लूक दिसत आहे. पोस्टरवरील सईचा ब्लॅक एन्ड व्हाइट आणि नो मेकअप लूक सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

मोबाईलमुळे जग खूप जवळ आलं आहे. फोटो, व्हिडिओ एडिटींगसाठी मोबाईलचा सर्रास वापर केला जातो. मात्र, मोबाईलचा किती मोठ्या स्तरावर उपयोग केला जाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे पाँडीचेरी हा चित्रपट. दिग्दर्शक सचिन कुंडलकर या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. सचिन आणि सई यांची हा एकत्र दूसरा चित्रपट आहे. या आधी सईने सचिन कुंडलकर दिग्दर्शित वजनदार चित्रपटामध्ये काम केले आहे. तर अमृता खानविलकर पहिल्यांदाच सचिन कुंडलकरबरोबर काम करत आहे. अमृताने काही दिवसांपूर्वी पाँडीचेरी चित्रपटातील तिचा लूक सोशल मीडियावर शेअर केला होता.

वैभव तत्त्ववादी, अमृता खानविलकर, सई ताम्हाणकर यांच्याबरोबर नीनी कुलकर्णी, महेश मांजरेकर, तन्मय कुलकर्णी यांच्या मुख्य भुमिका आहेत.

 

First Published on: February 28, 2019 5:43 PM
Exit mobile version