‘पठाण’ मधील दुसरं गाणं ‘झूमे जो पठाण’ प्रदर्शित; सोशल मीडियावर होतेय ट्रेंड

‘पठाण’ मधील दुसरं गाणं ‘झूमे जो पठाण’ प्रदर्शित; सोशल मीडियावर होतेय ट्रेंड

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’हा चित्रपट येत्या वर्षात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट महिन्याभरापासून चर्चेत आहेत. परंतु ‘पठाण’ हा चित्रपट मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटातील ‘बेशरम रंग’या गाण्याबद्दल काही लोक सतत विरोध करत आहेत. शिवाय या गाण्यामध्ये दीपिकाने भगव्या रंगाची बिकनी घालून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात आला आहे. या चित्रपटामुळे सामान्य व्यक्तींपासून राजकीय व्यक्तींपर्यंत अनेकजण आपली प्रतिक्रिया मांडू लागले आहेत. दरम्यान, अशातच आता या चित्रपटातील दुसरं गाणं देखील प्रदर्शित करण्यात आले आहे.

‘पठाण’ मधील ‘झूमे जो पठाण’ गाणं प्रदर्शित

नुकतंच प्रदर्शित करण्यात आलेलं ‘पठाण’ चित्रपटातील ‘झूमे जो पठाण’ गाण्याला प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देत आहेत. हे गाणं काही वेळातच ट्वीटरवर ट्रेंड होऊ लागलं आहे. या गाण्यामध्ये शाहरुख आणि दीपिका जबरदस्त डान्स करत आहेत. या गाण्यामध्ये दीपिका आणि शाहरुख वेगवेगळ्या आऊटफिटमध्ये दिसत आहेत. या गाण्याचे संगीत विशाल आणि शेखरने दिलं आहे. तर याचे बोल कुमार ने लिहिले आहेत. तसेच हे गाणं अरजीत सिंह आणि सुकृति कक्कर, विशाल-शेखर यांनी गायले आहे.

25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार चित्रपट
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान जवळपास 4 वर्षानंतर चित्रपटामध्ये झळकताना दिसणार आहे. शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. 2018 मधील ‘जीरो’ चित्रपटानंतर शाहरुख बॉलिवूडमध्ये पुन्हा धमाकेदार कमबॅक करत आहे. 25 जानेवारी 2023 मध्ये शाहरुखचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत असून शाहरुख व्यक्तिरिक्त दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत दिसतील. जॉन अब्राहम चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसेल.

 


हेही वाचा :

अदिती आणि आस्तादच्या ‘चर्चा तर होणारच!’ नाटकाला परदेशातून आवताण

First Published on: December 22, 2022 12:18 PM
Exit mobile version