रश्मिकाला पाहून चाहत्याने घेतला चक्क हृदयावर ऑटोग्राफ; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

रश्मिकाला पाहून चाहत्याने घेतला चक्क हृदयावर ऑटोग्राफ; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

टॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदानाचे अनेक चाहते आहेत. रश्मिका जिथे कुठे जाते तिथे तिच्या चाहत्यांचा गलका तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी जमा होतो. आता अशाच एक चाहत्याने रश्मिकाचा ऑटोग्राफ घेतला आहे. मात्र, रश्मिकाकडून हा ऑटोग्राफ त्याने हातावर किंवा कागदावर न घेता चक्क त्याच्या हृदयावर घेतला आहे. सध्या त्या चाहत्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

टॉलिवूड अभिनेत्री रश्मिकाचे संपूर्ण भारतात चाहते आहेत. त्यामुळे रश्मिका जिथे कुठे दिसेल तिथे चाहते तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी पुढे येतात. आता अशाच एका चाहत्याने रश्मिकाचा ऑटोग्राफ आपल्या हृदयावर घेतला आहे. खरंतर रश्मिका एका कार्यक्रमासाठी पोहोचली होती. त्यावेळी तिच्या चाहत्याने तिच्याकडे आगळीवेगळी मागणी केली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रश्मिका मंदानाने लाईट यलो रंगाचा ड्रेस घातला आहे. तिच्या चाहत्याच्या सांगण्यावरून ती त्याच्या हृदयावर ऑटोग्राफ करते.

या बॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकणार रश्मिका
खरंतर रश्मिका ‘मिशन मजनू’ या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा दिसून येईल. त्याशिवाय रश्मिका टायगर श्रॉफसोबत देखील एका चित्रपटात दिसणार आहे. तसेच रश्मिका करण जौहरच्या ‘कॉफी विद करण 7’ मध्ये सुद्धा दिसून येईल.


हेही वाचा :

‘मी आता मिठाई विकतो’ अभिनेते शरद पोंक्षेंनी सुरु केला नवा व्यवसाय

First Published on: September 27, 2022 3:32 PM
Exit mobile version