सेटवर होणार ज्येष्ठ कलाकारांची एन्ट्री, पण नियम मात्र होणार कडक!

सेटवर होणार ज्येष्ठ कलाकारांची एन्ट्री, पण नियम मात्र होणार कडक!

मराठी कलाकार

मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ कलाकारांना चित्रिकरणात सहभागी होण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे मालिकांच्या सेटवर आनंदाचं वातावरण आहे. साधारणपणे पुढील आठवड्यापासून ज्येष्ठ कलाकार सेटवर परतणार असल्याचं समजतय. पण ज्येष्ठ मंडळी सेटवर असल्यामुळे प्रत्येक सेटवर अधिक खबरदारी घेतली जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाच्या संसर्गाचा धोका जास्त असल्यानं सर्वतोपरी काळजी आणि नियमांचं आणखी काटेकोरपणे पालन करावं लागणार आहे.

ज्येष्ठांसाठी वेगळे नियम

ज्येष्ठांसाठी अधिक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. नियमित आरोग्य तपासणी, कामाचे तास कमी आणि आराम करण्यासाठी सेटवर वेगळी खोली असे उपाय आखले जात आहेत. ज्येष्ठ कलाकारांचा इतर कलाकारांशी आणि सेटवर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांशी संपर्क शक्य तितका टाळला जाणार आहे. ज्येष्ठ कलाकारांची सुरक्षितता लक्षात घेऊन या गोष्टी करण्यात येणार आहेत.

* ज्येष्ठ कलाकारांना विमा सुरक्षा मिळवून देण्याबाबत ‘इंडियन फिल्म्स अँड टेलिव्हीजन प्रोड्यूसर्स काउन्सिल’ प्रयत्नशील.

* ज्येष्ठ कलाकारांच्या कामाचे तास कमी असण्याची शक्यता

* विश्रांतीसाठी वेगळी खोली सेटवरच उपलब्ध करुन देणार.

* दर दोन-तीन तासांनी ऑक्सिमीटर आणि टेम्परेचर तपासणार

* ज्येष्ठ कलाकारांचा इतरांशी अनावश्यक संपर्क टाळणार


हे ही वाचा – दिशाचा मृतदेह नग्नावस्थेत? मुंबई पोलिसांनी केला खुलासा!


First Published on: August 11, 2020 12:49 PM
Exit mobile version