OTT: धमाकेदार मनोरंजनासाठी २०२२ सज्ज! रिलीज होणार ‘या’ १० वेब सीरीजचे सीक्वेल

OTT: धमाकेदार मनोरंजनासाठी २०२२ सज्ज! रिलीज होणार ‘या’ १० वेब सीरीजचे सीक्वेल

OTT: धमाकेदार मनोरंजनासाठी २०२२ सज्ज! रिलीज होणार 'या' १० वेब सीरीजचे सीक्वेल

या वर्षी म्हणजेच २०२१मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक दर्जेदार वेब सीरीज रिलाज झाल्या. फॅमिली मॅन२, असुर सीझन २ यासारख्या अनेक वेब सीरीजने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. २०२१मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या काही वेब सीरीजचे सिक्वेल म्हणजेच दुसरा पार्ट २०२२मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे २०२२ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहे. चला तर पाहूयात २०२२मध्ये रिलीज होणाऱ्या प्रसिद्ध १० वेब सीरीजचे सिक्वेल कोणते आहेत.

पाताल लोक

२०२०मध्ये ही सीरीज रिलीज झाली होती. जयदीप अहलावतने या सीरीजमध्ये धम्माल उडवली होती. या सीरीजचा सिक्वेल २०२२मध्ये रिलीज होणार आहे.

 दिल्ली क्राइम

अभिनेत्री शेफालीची प्रसिद्धी वेब सीरीज दिल्ली क्राइम २०१९मध्ये रिलीज झाली होती. या सिरीजच्या दुसऱ्या पार्टीची प्रेक्षक आतुरतेने पाट पाहत होते. २०२२च्या मार्च महिन्यात दिल्ली क्राइमचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पंचायत

जितेंद्र कुमार,नीना कुलकर्णी आणि रघुवीर अभिनीत पंचायत वेब सीरीजला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. मार्च २०२२मध्ये या सीरीजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

असुर

अशरद वारसीच्या असुर या वेब सीरीजने २०२१मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घातला. या सीरीजच्या दुसऱ्या पार्टची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. २०२२मध्ये असुर २ प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

फॅमिली मॅन

२०२१मध्ये असुरनंतर ओटीटी प्लॅटफॉर्म गाजलेली वेब सीरीज म्हणजे फॅमिली मॅन २. प्रेक्षकांच्या ही वेब सीरीज चांगलीच पसंतीस पडली. फॅमिली मॅन ३ या २०२२मध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

मिर्झापूर

मिर्झापूर सीझन २ ची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांची प्रतिक्षा २०२२मध्ये संपणार आहे. पंकज त्रिपाठी,अली फजल आणि श्वेता त्रिपाठी अशी स्टारकास्ट असलेल्या मिर्झापूरचा ३ २०२२मध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे.

मुंबई डायरिज

मुंबईवर झालेल्या २६\११ च्या हल्ल्यावर आधारित मुंबई डायरिज या सीरीजचा सिक्वल २०२२मध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे. २६\११ च्या हल्ल्यात बॉम्बे हॉस्पिटलमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचे चित्रण या सीरीजमध्ये करण्यात आले होते.

मेड इन हेवन

जोया अख्तर आणि रिमा कागती यांची मेड इन हेवन ही वेब सीरीज २०१९मध्ये रिलीज झाली होती. प्रेक्षकांना ही वेब सीरीज फार आवडली होती. या सीरीजचा सिक्वेल २०२२मध्ये रिलीज होणार आहे.

कोड एम

कोड एम या सीरीजमध्ये जेनिफर विंगट एका सस्पेंन्स केसचा उलगडा करत आहे. २०२२मध्ये या सीरीजचा सिक्वेल प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

आर्या २

आर्य १च्या तुफान प्रतिसादानंतर आर्य २ प्रेक्षकांच्या भेटीला आली. क्राइम थ्रीलर बेस्ड या सीरीजमधून अभिनेत्री सुष्मिता सेनने ओटीटी प्लॅटफॉर्मवर दमदार एंट्री केली. आता २०२२मध्ये आर्याचा तीसरा सीझन सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


हेही वाचा – Top Trends in Search 2021: २०२१मध्ये गूगलवर सर्वाधिक सर्च झालेले बॉलिवूड सेलिब्रेटी कोणते? जाणून घ्या

First Published on: December 17, 2021 6:41 PM
Exit mobile version