Pathan : पठाण चित्रपटाच्या शूटिंगसाठी शाहरुख- दीपिकाची ‘स्पेन’ वारी

Pathan : पठाण चित्रपटाच्या शूटिंगसाठी शाहरुख- दीपिकाची ‘स्पेन’ वारी

Pathan : पठाण चित्रपटाच्या शूटिंगसाठी शाहरुख- दीपिकाची 'स्पेन' वारी

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या पठाण चित्रपटामुळे चर्चेत आहेत. अशातच या चित्रपटातील गाण्याच्या शुटिंगसाठी ही जोडी स्पेनची वारी करण्याच्या तयारीत आहेत. शाहरुख-दीपिकाच्या मुख्य भूमिका असलेल्या पठाण चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. या चित्रपटातील काही सीन आणि गाणं स्पेनमध्ये शूट केलं जाणार आहे.

सिद्धार्थ आनंद यांनी या चित्रपटाच्या शूटिंगसंबंधीत सर्व परवानग्या घेतल्या असून ते स्पेनला जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. या चित्रपटात एक धमाकेदार व्हीएफएक्स पाहणार आहोत. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते सिद्धार्थ आनंद आणि आदित्य चोप्रा हे जागतिक पातळीवर या चित्रपटाचं शूटिंग करत आहेत. या कामासाठी सतत प्रयत्न केले जात आहेत.

पठाण चित्रपटात शाहरुख आणि दीपिकासह जॉन अब्राहम देखील या मुख्य भूमिकेत झळकणार आहे. जॉन अब्राहम या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणार आहे. जो शाहरुख खानला टफ फाईट देईल. जॉनसोबत या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता आशुतोष राणासुद्धा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहो. या चित्रपटात अभिनेता आशुतोष राणा रॉच्या संयुक्त सचिवाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर डिंपल कपाडिया देखील या चित्रपटात त्याला साथ देताना दिसेल. शाहरुख खाननं दुबईला जाऊन या चित्रपटाचे अॅक्शन सीक्वन्स शूट केले. तसेच या चित्रपटात, सलमान खानला आपण एक उत्कृष्ट कॅमिओ करताना देखील पाहु शकणार आहोत.


Khatron Ke Khiladi Season 11 : ‘खतरो के खिलाडी’मध्ये आस्था, सौरभसह विशालची पुन्हा वाइल्ड कार्ड एन्ट्री


 

First Published on: August 29, 2021 4:28 PM
Exit mobile version