शाहिद कपूर पुन्हा दिसणार ‘या’ रिमेकमध्ये?

शाहिद कपूर पुन्हा दिसणार ‘या’ रिमेकमध्ये?

शाहिद कपूर (सौजन्य-डेक्कन क्रोनियल)

नुकताच बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा ‘कबीर सिंग’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील शाहिदच्या भूमिकेला चाहत्यांनी भरभरून कौतुक केले तसेच काहींनी कबीरच्या भूमिकेवर टीका देखील केल्याचे पाहिला मिळाले. बऱ्याच काळानंतर प्रदर्शित झालेला चित्रपटात शाहिद कपूरने दणक्यात एण्ट्री केली.

दक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा यांचा चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटाचा कबीर सिंग हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाच्या रिमेकमध्ये उत्तम अभिनय केल्यानंतर आता त्याला आणखी एका रिमेकसाठी विचारणा केल्याचे कळतेय.

धर्मा प्रॉडक्शन तेलुगू चित्रपट ‘जर्सी’चा हिंदी रिमेक करण्यासाठी शाहिदचा विचार केला जातोय, अशी चर्चा सध्या सुरू आहे. या चित्रपटाच्या रिमेकमध्ये शाहिदने मुख्य भूमिका साकारावी असे निर्मात्यांची इच्छा आहे.

सध्या शाहिद कपूर चांगल्या भूमिकांच्या शोधात असल्याने ‘कबीर सिंग’ सुपरहिट झाल्यानतंर आणखी एका चित्रपटाच्या रिमेकमध्ये शाहिद अभिनय करणार की नाही हे पाहणं चाहत्यांसाठी उत्सुकतेचे असणार आहे.

First Published on: July 1, 2019 2:51 PM
Exit mobile version