‘पद्मावती’ सोबत ‘रावल रतन सिंघ’ही लंडनला

‘पद्मावती’ सोबत ‘रावल रतन सिंघ’ही लंडनला

सौजन्य- इन्स्टाग्राम

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचा पुतळा, लवकरच लंडनच्या मादाम तुसाद म्युझियममध्ये उभारण्यात येणार आहे. याबाबत दीपिकाने नुकतीच अधिकृत घोषणा केली असून, तिचे चाहते या बातमीमुळे खुष झाल्याचं पाहायला मिळत आहे. याचसंदर्भात दीपिकाने शेअर केलेल्या एका फोटोला सोशल मीडियावर चाहत्यांची भरभरुन पसंती मिळते आहे. मात्र, आता दीपिका पाठोपाठ अभिनेता शाहीद कपूरही लंडनच्या वाटेवर निघाला आहे. मादाम तुसाद म्युझियममध्ये शाहीद कपूरचाही पुतळा उभारण्यात येणार आहे. शाहीदने याबाबत अधिकृत घोषणा करत एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘तुमचे डोळे उघडे ठेवा, मी लवकरच येतोय’ असं कॅप्शन शाहीदने या फोटोला दिलं आहे. या बातमीमुळे शाहीदचे फॅन्स सुखावले असून, सोशल मीडियावर त्यांच्या सुखद प्रतिक्रीया उमटताना दिसत आहेत. शाहीद आणि दीपिकाच्या पुतळ्याचं काम सुरु झालं असून, २०१९ पर्यंत त्यांचे पुतळे तयार होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. थोडक्यात आता ‘पद्मावती’ पाठोपाठ ‘राजा रावल रतन सिंघ’ देखील लंडनच्या वारीला निघाला आहे.

‘मादाम तुसाद’ मधील भारतीय मानकरी

मेणाच्या पुतळ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘मादाम तुसाद’ म्युझियममध्ये, आजर अनेक भारतीय दिग्गजांना स्थान मिळाले आहेत. विवध क्षेत्रातील भारतीय दिग्गजांचे मेणाचे पुतळे मादाम तुसामध्ये ठेवण्यात आले आहेत. जाणून घ्या, कोणकोणत्या दिग्गजांचा यामध्ये समावेश आहे ते…

सौजन्य- इन्स्टाग्राम
First Published on: July 24, 2018 11:44 AM
Exit mobile version