‘या’ कारणामुळे अभिनेत्री शमिता शेट्टी प्रसार माध्यमांशी नाराज

‘या’ कारणामुळे अभिनेत्री शमिता शेट्टी प्रसार माध्यमांशी नाराज

अभिनेत्री शमिता शेट्टी (सौजन्य - इन्स्टाग्राम)

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टी सध्या प्रसार माध्यमांवर नाराज आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. आपली वाईट काळ सुरु असल्याचे तिने म्हटले आहे. सेल्फी घेणाऱ्या फॅन सोबत शमिताने गैरव्यवहार केला असल्याचा दावा प्रसार माध्यमांनी केला होता. यासंबधीत एका व्हिडिओ सोशल मीडियावप व्हायरल झाला होता. यानंतर शमिनताने आपल्या विरोधात छापून आलेल्या बातम्यांचे फोटो काढून इन्स्टाग्रामवर शेअर केले.

काय होते व्हिडिओत 

शमिता शेट्टीच्या महिला फॅनला तिच्या सोबत सेल्फी काढायलाचा होता. त्यावेळी शमिता फॅन्सला सेल्फी काढण्याची पद्धत दाखवत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शमिता आपल्या फॅन्सशी उद्धट वागते अशा बातम्या प्रासार माध्यमांमध्ये आल्या होत्या. यानंतर शमिताने आपली बाजू इन्स्टाग्रावर मांडली आहे.

काय म्हणाली शमिता

“मला वाईट वाटत आहे… कलाकाराच्या मनोस्थितीला कोणीही ओळखू शकत नाही. स्लीप डिस्कचा त्रास असल्यामुळे मला डॉक्टरांकडे जाण्यास उशीर होत होता. मला माझ्या आजाराच्या खोलात जायचे नाही. मला उशीर होत असताना देखील मी माझ्या फॅन्सची फोटो काढण्याची इच्छा पूर्ण केली. माझ्यावर उपचार सुरु असल्याने मला दुखापत होते. मात्र तरीही मी चेहेऱ्यावर स्माइल देऊन सर्वांना भेटत होते. शिवाय मी सेल्फी घेण्यास एका फॅनला मदतही केली. मी माझ्या फॅन्सचा मान ठेवते आणि त्यांनी दिलेल्या प्रेमाची इज्जत करते. मला स्पष्टीकरण द्यायचे नाही मात्र मी ही एक माणूस आहे मला ही दुखापत होऊ शकते. आपल्या सर्वांच्या नशिबात वाईट दिवस येतात. कदाचित यावेळी माझी वेळ आली.” – शमिता शेट्टी, अभिनेत्री

First Published on: February 19, 2019 8:34 AM
Exit mobile version