शंकर महादेवन यांना शोध ‘या’ आवाजाचा

शंकर महादेवन यांना शोध ‘या’ आवाजाचा

एका लाईव्ह कॉन्सर्टमधील शंकर महादेवन यांचा फोटो (सौजन्य- patrika.com)

सध्या संगीत दिग्दर्शक शंकर महादेवन एका आवाजाच्या शोधात आहे. आता शंकर महादेवन सारख्या महान संगीतकाराला नव्या आवाजाचा शोध का? असा प्रश्न पडला असेल तुम्हाला. शंकर महादेवन यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात कोणीतरी तामिळमधले एक गाणे गात आहे. हा माणूस शेतकरी असून त्याचा आवाज इतका सुरेल आहे की, साक्षात शंकर महादेवन यांच्या काळजाला हा आवाज भिडला आहे. त्यांनी चक्क त्यांच्या पोस्टमधून ‘हा आवाज कोणाचा आहे माहित नाही. देशातील टँलेटचा मला खूप अभिमान आहे, या व्यक्तीला मी कसा शोधू शकतो? या व्यक्तीसोबत काम करायची इच्छा आहे’, असे त्यांनी या पोस्टमधून सांगितले आहे.

बघा नेमकं काय शेअर केलं आहे शंकर महादेवन यांनी

 

शेअर केला त्याचा व्हिडिओ

गायक, संगीत दिग्दर्शक शंकर महादेवन यांना हा आवाज इतका आवडला की, त्यांनी हा व्हिडिओ त्याच्या ट्विटर अकांऊटवरुन शेअर केला आहे. जगभरात शंकर महादेवनचे इतके चाहते आहेत की, शंकर यांच्या या ट्विटला रिट्विट केले आहेत. आणि जणू त्यांच्या चाहत्यांनी व्हिडिओतील माणसाला शोधण्याचा पवित्राच घेतला आहे.

व्हिडिओमधील गाणं विश्वरुपममधलं

कमल हसन यांचा  तामिळ भाषेतील सुपर हिट सिनेमा विश्वरुपममधील हे गाणे असून हे गाणं शंकर महादेवन आणि कमल हसन यांनी गायले आहे. २०१३ मध्ये हा सिनेमा तामिळ, तेलगू, हिंदी भाषेत रिलीज झाला. शंकर महादेवन यांनी या माणसाचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर पुन्हा  एकदा विश्वरुपममधले हे गाणे चर्चेत आले आहे. विशेष म्हणजे विश्वरुपमच्या फॅन्सनी हे गाणे शंकर महादेवन यांच्या ट्विटवर रिट्विट केले आहे.

(सौजन्य- सोनी म्युझिक)

 

First Published on: July 1, 2018 1:47 PM
Exit mobile version