तब्बल ४० वर्षानंतर ‘हिमालयाची सावली’ पुन्हा रंगभूमीवर!

तब्बल ४० वर्षानंतर ‘हिमालयाची सावली’ पुन्हा रंगभूमीवर!

सध्या अनेक जूनी नाटकं नव्याने पुर्नजीवीत होऊन रंगभूमीवर दाखल होत आहेत. ‘एकच प्याला’,’नटसम्राट’,’अश्रृंची झाली फुले’ या पुर्नजीवीत झालेल्या नाटकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. असच आणखी एक नाटक रंगभूमीवर दाखल होणार आहे. प्रा. वसंत कानेटकर यांच्या लेखणीने सजलेल्या आणि डॉ. श्रीराम लागू ,शांता जोग, अशोक सराफ या कलाकारांच्या उत्तम अभिनयाच्या अदाकारीने गाजलेल्या ‘हिमालयाची सावली’ हे नाटक पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘हिमालयाची सावली’ या नाटकाचे दिग्दर्शन राजेश देशपांडे करणार आहेत. या नाटकातून अभिनेते शरद पोंक्षे पुन्हा एकदा रंगमंचावर येणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून शरद पोंक्षे रंगभूमीपासून दूर होते.
गेल्या डिसेंबरपासून कर्करोगावर उपचार घेत असल्यामुळे त्यांना कलाविश्वापासून दूर जावं लागलं होतं. मात्र या उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून ते ‘हिमालयाची सावली’ या नाटकातून रंगमंचावर येणार आहेत. ‘हिमालयाची सावली’मध्ये शरद पोंक्षे हे नाना साहेबांची भूमिका साकारणार आहेत. ४० वर्षांपूर्वी ही भूमिका श्रीराम लागू यांनी साकारली होती.

तब्बल ४० वर्षानंतर हे नाटक रंगभूमीवर येत आहे. जून्या पिढीसाठी हे नाटक आठवणींना उजाळा देणारे ठरणार आहे. तर नवीन पिढीसाठी ‘हिमालयाची सावली’ ही मेजवानी ठरणार आहे.

First Published on: August 31, 2019 7:27 PM
Exit mobile version