शाहरूख सोबतचा जुना फोटो शेअर करत बिग बींनी दिले ‘डॉन 3’ चित्रपटाचे संकेत

शाहरूख सोबतचा जुना फोटो शेअर करत बिग बींनी दिले ‘डॉन 3’ चित्रपटाचे संकेत

आपल्या 44 वर्ष जुन्या चित्रपट डॉनच्या पोस्टरवर सही करतानाचा एक फोटो अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. या फोटोमध्ये अमिताभ बच्चनसोबत अभिनेता शाहरूख खान सुद्धा उभा आहे. मात्र हा फोटो पाहिल्यानंतर शाहरूखच्या चाहत्यांनी फरहान अख्तरला चांगलंच धारेवर धरलंय. कारण याआधी शाहरूखला सोबत घेऊन फरहान अख्तरने ‘डॉन’ चित्रपट आणि त्याचा दुसरा सिक्वेलही बनवलेला आहे, मात्र आता या गोष्टीला अनेक काळ लोटून गेला. फरहान अख्तर ‘डॉन 3’ चित्रपटाची अनाउंसमेंट कधी करणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

 


हेही वाचा :मालदीवमध्ये मुलीला सोबत घेऊन अनुष्का शर्माने चालवली सायकल

First Published on: June 20, 2022 9:31 AM
Exit mobile version