ती खरी हिंदूच… साराने घेतलं घृष्णेश्वराचं दर्शन; चाहत्यांनी केलं कौतुक

ती खरी हिंदूच… साराने घेतलं घृष्णेश्वराचं दर्शन; चाहत्यांनी केलं कौतुक

अयोध्येतील राम मंदिराचा उद्घाटन सोहळा सोमवारी (22 जानेवारी) रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी देशभरातील लाखो हिंदू अयोध्येत उपस्थित झाले होते. तसेच भारतीय नागरिकांनी संपूर्ण देशभरात दिवे, भगवे झेंडे लावून आनंद साजरा केला.

अयोध्येतील राम मंदिराच्या सोहळ्यात अनेक दिग्गज कलाकार, खेळाडू तसेच नेत्यांना देखील आमंत्रित करण्यात आलं होतं. ज्यात अमिताभ बच्चन, अनुपम खेर, रणदीप हुड्डा, विक्की कौशल, कतरिना कैफ, रणबीर कपूर, आलिया भट्ट, माधुरी दीक्षित, हेमा मालिनी, रजनीकांत यांसारखे बरेच कलाकार होते. तसेच जे कलाकार अयोध्येत जाऊ शकले नाहीत त्यांनी घरातून तसेच इतर मंदिरात जाऊन हा आनंद साजरा केला. बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने देखील शिव मंदिरात जाऊन हा आनंद साजरा केला.

शिव मंदिरात जाऊन सारा अली खानने केली पूजा

शिव मंदिरात गेल्याने सारा ट्रोल

अनेकजण साराचं कौतुक करत असले तरी काही मुस्लिम युझर्स साराला ट्रोल करताना दिसत आहेत. एकाने कमेंटमध्ये लिहिलंय की, “तू मुस्लिम असून हिंदू मंदिरात का जातेस.. तू अल्लाहला काय उत्तर देणार?” तर दुसऱ्याने लिहिलंय की, “मुस्लिमच्या नावावर डाग आहेस तू”  तसेच इतरही अनेकांनी तिला धर्मावरुन ट्रोल केलं आहे.


हेही वाचा : पठाण ते फायटर : दीपिका पदुकोणचा प्रजासत्ताक दिनी धमाका!

First Published on: January 24, 2024 11:59 AM
Exit mobile version