Shehnaaz Gill: शहनाजचा ‘झिंगाट’ डांस सोशल मीडियावर व्हायरल

Shehnaaz Gill: शहनाजचा ‘झिंगाट’ डांस सोशल मीडियावर व्हायरल

Shehnaaz Gill:शहनाजचा 'झिंगाट' डांस सोशल मीडियावर व्हायरल

बिग बॉस (Bigg Boss)फेम शहनाज गिलने (Shehnaaz Gill)नुकतचं आपल्या मित्राच्या साखरपुड्याला हजेरी लावली होती. या सेलिब्रेशनचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर (Social Media)व्हायरल होत आहेत. या पार्टी दरम्यान शहनाज ‘झिंगाट’ गाण्यावर डांस करताना दितस आहे. एका मोठ्या काळानंतर शहनाज अशाप्रकारे एंजॉय करताना दिसत असल्याने सगळेजण आनंदीत झाले आहे. ब्लॅक बॉडी फिट शिमर ड्रेसमध्ये शहनाज अत्यंत ग्लॅमरस दिसत आहे. या पार्टीला तिच्या जवळच्या मित्र मैत्रीणिंने देखील हजेरी लावली होती.(Shehnaaz Gill Video viral On Social Media)

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या(Siddharth Shukla) आकस्मिक निधनानंतर शहनाज गिलला प्रचंड मोठा मानसिक धक्का बसला होता. मात्र स्वत:ला सावरत तिने पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केलं आहे. काही दिवसांपूर्वी शहनाजचा ‘हौसला रख’ हा सिनेमा रिलीज झाला होता. सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाज सोशल मीडियावर फार जास्त अॅक्टीव नसते. मात्र तिच्या आगामी प्रोजेक्ट बाबतची माहिती चाहत्यांसोबत ती आवर्जून शेअर करते.

आर्टिस्ट मॅनेजर आणि निर्माता कौशल जोशी याच्या एंगेजमेंटला शेहनाजने हजेरी लावली होती यावेळी तिच्या सोबत कश्मीरा शाह , जॉर्जिया एंड्रियानीसह अनेकजण दिसत आहेत कॉमेडीयन पारितोष तिवारीने त्याच्या इंस्टाग्राम अकांऊटवर काही फोटो पोस्ट केले होते. तर ट्विटरसह इतर सोशल मीडिया अकांऊटवर शहनाजच्या फॅन पेजेसने तिचा डांस व्हिडिओ शेअर केला आहे चाहत्यांनी देखील याला भरभरून प्रतिसाद दिला आहे.

व्हिडिओ पाहा- 

बिग बॉसमध्ये सिद्धार्थ आणि शहनाजची भेट झाली आणि तिथेच त्यांची मैत्री बहरली. मात्र दोघेही प्रेमात आहे की नाही?; याचा खुलासा त्यांनी कधीच केला नव्हता मात्र अनेक प्रमोशन इव्हेंट, पार्टी दरम्यान त्यांना एकत्र स्पॉट केलं जात होतं. मात्र सिद्धार्थच्या जाण्याने शहनाजच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली. चाहत्यांना देखील प्रचंड मोठा धक्का बसला. मात्र पुन्हा एकदा शहनाजला काम करताना पाहून चाहते देखील सुखावले.


हे हि वाचा – Salman Khan Viral Meme:भाईचा बड्डे अन् चर्चा मात्र सापाची

First Published on: December 27, 2021 6:35 PM
Exit mobile version