पापाराझींसोबत श्रद्धाने केली पिझ्झा पार्टी; व्हिडीओ व्हायरल

पापाराझींसोबत श्रद्धाने केली पिझ्झा पार्टी; व्हिडीओ व्हायरल

श्रद्धा कपूर बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्रींनपैकी एक असून, तिचा चाहतावर्ग मोठा आहे यात शंका नाही. श्रद्धाच्या साधेपणाचे नेहमीच चाहते कौतुक करताना दिसतात. अनेकदा सोशल मीडियावर श्रद्धा विविध पदार्थ खात असतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. आता श्रद्धाचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात एका इव्हेंटमध्ये पोहोचलेली श्रद्धा अचानक पिझ्झा खायला गेल्याचं दिसत आहे.

पापाराझींसोबत श्रद्धाने केली पिझ्झा पार्टी

दरम्यान, आता सोशल मीडियावर श्रद्धा कपूर पापाराझींकडून पिझ्झा मागतानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहत्यांना श्रद्धाची डाउन टू अर्थ वागणूक खूप आवडली. अनेकजण तिच्या साधेपणाचं खूप कौतुक करताना दिसत आहेत.

 


हेही वाचा :

Prasad Oak : प्रसाद ओककडून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या टीमला पार्टी

First Published on: March 19, 2024 3:39 PM
Exit mobile version