बिग बॉसच्या घरात सिद्धार्थ शुक्ला आणि रश्मी देसाईचा रोमान्स

बिग बॉसच्या घरात सिद्धार्थ शुक्ला आणि रश्मी देसाईचा रोमान्स

‘बिग बॉस १३’ या सिझन मधील घरात नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणांवरून सदस्यांची भांडणं होत असतात. सध्या घरात प्रेमाचं वातावरण निर्माण झाल्याचं दिसतं आहे. याच संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बिग बॉसच्या घरातील कट्टर दुश्मन असलेले सदस्य म्हणजे रश्मी देसाई आणि सिद्धार्थ शुक्ला. मात्र हे दोघं या व्हिडिओमध्ये चक्क रोमान्स करताना दिसतं आहे. हाच रोमँटिक व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे. या दोघांची पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात केमिस्ट्री पाहायला मिळाली आहे. या दोघांच्या केमिस्ट्रीवर चाहते फिदा झाले आहेत.

बिग बॉस सिझन १३ मधील हा व्हिडिओ एका टास्क दरम्यानचा आहे. या टास्कमध्ये शहनाज गिल आणि पारस छाबडा हे दोघं दिग्दर्शक असून त्या दोघांना एक रोमँटिक व्हिडिओ तयार करायचा होता. शहनाजने सिद्धार्थ आणि रश्मीला जोडी म्हणून निवडलं तर पारसने विशाल आणि माहिराला निवडलं. मात्र या दोन जोडीपैकी प्रेक्षकांना सिद्धार्थ आणि रश्मीची केमिस्ट्री खूप आवडली.

या व्यतिरिक्त असिम आणि आरतीचा व्हिडिओ देखील खूप चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये असिम आरतीसोबत गाणं गाताना दिसत आहे. याच दरम्यान आरती असिमला विचारते की, ‘तू हिमांशी खुरानाच्या प्रेमात पडला आहेस का?’ यावेळी असिम म्हणाला की, ‘मला ती फक्त आवडते.’ त्यामुळे आता असिम आणि हिमांशीची देखील केमिस्ट्री लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळाणार आहे.

या आठवड्यात माहिरा शर्मा, पारस छाबडा, शेफाली जरीवाला, हिंदुस्तानी भाऊ, आरती सिंह आणि शहनाज गिल नॉमिनेट आहे. तर आता बिग बॉस सिझन १३ मधून कोण बाहेर जाईल हे येत्या काळात कळेल.


हेही वाचा – ‘या’ गायिकेची पर्स पाहून व्हाल थक्क


 

First Published on: November 26, 2019 3:51 PM
Exit mobile version