साज आणि आवाज

साज आणि आवाज

Shreyas Talpade

बोरिवलीमध्ये सांस्कृतिक कार्य करणार्‍या ज्या अनेक सेवाभावी संस्था आहेत त्यात सांस्कृतिक केंद्राने सामाजिक कार्याबरोबर परंपरेने आलेल्या कलेची जपणूकही तेवढीच केलेली आहे. या संस्थेने यंदा ‘रजत जयंती महोत्सव’ साजरा करण्याचे ठरवलेले आहे. त्यासाठी प्रजासत्ताक दिन हा दिवस त्यांना महत्त्वाचा वाटलेला आहे. शास्त्रीय संगीतात योगदान देणार्‍या गायक, वादक कलाकारांना यासाठी निमंत्रित केले गेलेले आहे. २६ जानेवारीची संध्याकाळ ही ‘साज आणि आवाज’ यांचा मिलाफ साधणारी असणार आहे.जागतिक कीर्तीचे बासरीवादक पं. रोणु मुजुमदार, सरोदवादक पं. देबज्योती बोस, पार्श्वगायिका वैशाली माडे, तबलावादक अजित पाठक, पखवाजवादक गोविंद भिलारे हे या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. बोरिवली इथल्या ज्ञानसागर ऍम्प्लिथिएटर इथे हा कार्यक्रम होणार आहे. सांगीतिक रजनीचा आनंद मुंबईकरांना विनामूल्य घेता येईल.

श्रेयसचे येणे निश्चित झाले
श्रेयस तळपदेचे नाव घेतल्यानंतर त्याचा हिंदीतला पसारा पाहिल्यानंर श्रेयसचे छोट्या पडद्यावर येणे कसे निश्चित होईल असा प्रश्न मराठी प्रेक्षकांच्या मनात येणे साहजिकच आहे. हिंदीत बड्या स्टार्सबरोबर तो काम करतो आहे. दिग्दर्शन, निर्मिती अशाही जबाबदार्‍या तो पार पाडतो आहे. त्यातून कुठल्या मालिकेला वेळ देणे तसे कठीण; पण सोनी सबने त्याची पूर्वतयारी करून २६ जानेवारीला नव्याने सुरू होणार्‍या ‘माय नेम इज लखन’ या मालिकेसाठी त्याला तयार केलेले आहे. शनिवार, रविवार सायंकाळी ७.३० वाजता ही मालिका दाखवली जाणार आहे.

‘माय नेम इज लखन’ या मालिकेमध्ये लखनची मुख्य भूमिका स्वत: श्रेयस साकारणार आहे हे वेगळं सांगायला नको. कॉमेडी सर्कसमध्ये हमखास मोकळ्या मनाने हसणारी अर्चना पुरणसिंग आणि तिचा पती परमित सेठी यांचा कलाकार म्हणून या मालिकेत सहभाग आहे. संजय नार्वेकर या मराठी कलाकारावरसुद्धा एक महत्त्वाची भूमिका सोपवलेली आहे. या चौघांनीही मोठ्या पडद्यावर काम करून फिल्मीक्षेत्रात नाव कमवलेले आहे. लखनच्या निमित्ताने हे सर्व कलाकार एकत्र आलेले आहेत. त्यांना छोट्या पडद्याच्या प्रेक्षकांनाही खूश करायचे आहे. त्यादृष्टीने त्यांनी ही मालिका स्वीकारलेली आहे.

First Published on: January 23, 2019 5:19 AM
Exit mobile version