B Praak : सिंगर बी प्राक होणार पुन्हा बाबा; लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवशी प्रेग्नेंसीची घोषणा

B Praak : सिंगर बी प्राक होणार पुन्हा बाबा; लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवशी प्रेग्नेंसीची घोषणा

‘तेरी मिट्टी’ हे गाणं गाणारा सिंगर बी प्राक (B Praak) आणि त्यांची पत्नी मीरा बच्चन (Meera Bachan) दुसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याची माहिती त्यांनी सोमवारी रात्री त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून दिली आहे. त्यांनी एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याची पत्नी तिच्या बेबी बंपला फ्लाँट करताना दिसत आहे. तर बी प्राक हा देखील तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत आहे. या फोटोमध्ये दोघेही क्यूट दिसत आहेत.

 

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओला बी प्राक यांनी सुंदर कॅप्शन (caption) दिले आहे. आयुष्यभर प्रेमात पडण्यासाठी नऊ महिन्यांची वाट पाहावी लागते #smmer2022, असे कॅप्शन दिले आहे. बी प्राक याने त्याच्या लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवशी प्रेग्नेंसीची घोषणा केली. 2019 मध्ये सिंगर बी प्राक आणि त्यांची पत्नी मीरा बच्चन यांचं चंदीगढमध्ये लग्नबंधनात अडकले. 2020मध्ये मीरा आणि प्राक यांना पहिला मुलगा झाला आहे.

 

या फोटोमध्ये बी प्राकने लिहिलं की, आम्हा दोघांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू माझी जगातील आवडती व्यक्ती आहेस, बेस्ट फ्रेंड आहेस आणि तू माझी सर्वस्व आहेस मीरा. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. बी प्राकच्या फोटोवर टिपण्णी करताना मीराने लिहिलं की, मी तुझ्यावर प्रत्येक गोष्टीपेक्षा जास्त प्रेम करते. मला पाहिजे ते सर्व काही दिल्याबद्दल धन्यवाद.

 

प्रतीक बच्चन (Prateek Bachan) हा त्याच्या टोपण नावाने म्हणजे बी प्राक या नावाने प्रसिद्ध आहे. त्याने संगीत दिग्दर्शकासोबत अनेक हिंदी आणि पंजाबी गाणी गायली आहेत. तसेच त्याची संगीत निर्माता म्हणून प्रसिद्ध आहे. प्राक याचं मन भराया या गाण्याने गायक म्हणून पदार्पण झाले आहे. गीतकार जानी यांच्यासोबत अनेकदा काम केले आहे.
2019 मध्ये अक्षय कुमारचा तेरी मिट्टी हे गाणे गायले होते. या गाण्यासाठी प्राकला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार मिळाला असून, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला होता. प्राकने ‘फिलहाल’, ‘ओ साकी साकी रिमेक’, ‘कुछ भी हो जाए’, ‘रांझा’सह अशी अनेक गाणी गायली आहेत.

First Published on: April 5, 2022 5:50 PM
Exit mobile version