पतीच्या त्रासाला कंटाळून गायिकेची आत्महत्या

पतीच्या त्रासाला कंटाळून गायिकेची आत्महत्या

बॉलिवूड कलाकारांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. २७ डिसेंबरला अभिनेता कुशल पंजाबीने आत्महत्या केली त्यापाठोपाठ ‘दिल तो हैप्पी हे जी’ या मालिकेतील सेजल शर्माने आत्महत्या केली. या दोघांच्या आत्महत्येमुळे बॉलिवूड हादरले. आता दाक्षिणात्य गायिकेन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या गायिकेचे नाव सुष्मिता असे आहे. सुष्मिताने सोमवारी सकाळी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे.

सुष्मिताने शरथ कुमारशी लग्न केले होते. शरथ हा एका खासगी कंपनीमध्ये काम करत आहे. आत्महत्याकरण्यापूर्वी तीने एक नोट लिहीली आहे. त्याचबरोबर आपल्या आईला आणि भावाला व्हॉट्सअॅप मेसेज पाठवला होता. गायिकेने नोटमध्ये पती, त्याची बहीण आणि काकी यांनी तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. तसेच सुष्मिताने आत्महत्या केल्याचे तिच्या भावाने पोलीसांना कळवले. तिने रात्री एकच्या सुमारास भाऊ सचिनला व्हॉट्स अॅप मेसेज करुन पती आणि त्याचा घरातील इतर सदस्य तिला त्रास देत असल्याचे सांगितले. सचिनने तो मेसेज सकाळी साडेपाच वाजता पाहिला. त्यानंतर त्याने लगेच बहिणीच्या घराकडे धाव घेतली असल्याचे पोलिसांनी सांगितले. बंगळुरुमधील अन्नपूर्णेश्वरी नगर येथील पोलीस आरोपी शरथचा शोध घेत आहेत

सुष्मिताने ‘हलू थूप्पा’ आणि ‘श्रीसमन्या’ या चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.

First Published on: February 18, 2020 2:21 PM
Exit mobile version