जागतिक कीर्तीचे दिलरुबा वादक शरद हजारे हरपले

जागतिक कीर्तीचे दिलरुबा वादक शरद हजारे हरपले

जागतिक कीर्तीचे दिलरुबा वादक शरद हजारे हरपले

जागतिक कीर्तीचे दिलरुबा वादक ज्येष्ठ सतार वादक शरद हजारे यांचे गुरुवारी पहाटेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. शेवटच्या श्वासापर्यंत सतार वादनाचे धडे देत होते. त्यांच्या मृत्यूने संगीत गायन क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. डोंबिवली पश्चिमेतील सम्राट चौकातील शिवतीर्थ सोसायटीत ते राहत होते. शास्त्रीय संगीत, गायनमध्ये ते पारंगत होते. जगात तिसऱ्या क्रमांकाचे दिलरुबा वादक होते. घरीच संगीताचे क्लासेस घेत.

हार्मोनियम, व्हॉयलीन, की-बोर्ड, दिलरुबा वादक होते. दिलरुबा नामशेष झाले असतानाच त्याची शिकवण देत असत. विशेष करून दिलरुबा शिकण्यासाठी त्यांच्याकडे येत असत. शास्त्रीय संगीत, हिंदुस्थानी गायन-वादन भजन गात असत. त्यांचे आध्यात्मिक विचार, सचोटीने वागण्याची वृत्ती होती. त्यांच्या सांगीतिक शिक्षणाची वाटचाल वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ होती, असे त्यांच्या सून कल्पना हजारे यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले.

दोन दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या दोन्ही मुलांचे निधन झाले असून, त्यांच्या पश्चात दोन स्नुषा, नातवंडे असा परिवार आहे. डोंबिवली पूर्वेतील मोक्षधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी संगीत गायन क्षेत्रातील मंडळी आणि त्यांचे शिष्य उपस्थित होते.

First Published on: August 29, 2019 3:37 PM
Exit mobile version