तापसीच्या चित्रपटाचा ट्रेलर ‘या’ भाजपच्या महिला नेत्याने केला शेअर!

तापसीच्या चित्रपटाचा ट्रेलर ‘या’ भाजपच्या महिला नेत्याने केला शेअर!

अनुभव सिन्हा यांच्या दिग्दर्शित “थप्पड़” चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. मुल्क आणि आर्टिकल १५ सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केल्यानंतर आता ‘थप्पड’ या आपला आगामी चित्रपट घेऊन अनुभव सिन्हा प्रेक्षकांसमोर आले आहेत. चित्रपटाच्या या दमदार ट्रेलरची संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये चर्चा असताना केंद्रीय मंत्री स्मृति ईरानी यांनी देखील या ट्रेलरचे अतिशय कौतुक केले. स्मृति ईरानी यांनी आपल्या सोशल मीडियावर ट्रेलर शेयर करताना लिहिले, “किती लोकं हा विचार करतात की मारपिटाई केवळ गरीब महिलांचे पतीच करतात आणि किती लोक हे मानतात की, शिक्षित माणसं कधी हात नाही उचलत”

किती लोक आपल्या मुलींना, सुनांना हे म्हणतात, की काही हरकत नाही मुली, हे तर आमच्या सोबत देखील झाले आहे तरीही बघ आम्ही आज आनंदात आहोत ना” “मी कदाचित दिग्दर्शकाच्या राजनैतिक विचारधारेचे समर्थन नाही करणार किंवा काही मुद्द्यांवर काही कलाकारांसोबत असहमत असेन परंतु ही एक अशी कहाणी आहे जी मी नक्कीच बघेन आणि मला विश्वास आहे की दर्शक देखील ती आपल्या परिवारासोबत बघतील” मंत्री इराणी यांनी पुढे म्हटले, “एका महिलेला मारणे योग्य नाही… थप्पड़ पण नाही… बस एक थप्पड़सुद्धा नाही. ”

स्मृति ईरानी यांच्या प्रतिक्रियेवर बोलताना, चित्रपटाचे दिग्दर्शक लिहितात,”माननीय महोदया, कधी कधी जेव्हा असहमतिला अयोग्य ठरवले जाते तेव्हा कहाणी प्रति आपली मान्यता आणि फिल्म निर्मात्याची इच्छा, राजनीतिक असहमति पासून खूपच दूर निघून जातात. महोदया, मी आपल्या या प्रेमपूर्वक शब्दांसाठी आपले हार्दिक आभार मानतो. चित्रपट पूर्ण झाल्यानंतर तो आपल्याला दाखवणं हा चांगला अनुभव असेल आणि मी आपल्या सुविधेनुसार वेळ ठरवण्यासाठी आपल्या कार्यालयाशी संपर्क साधेन. पुनश्च एकदा धन्यवाद मैडम” अनुभव सिन्हा आणि भूषण कुमार द्वारा निर्मित आणि तापसी पन्नू द्वारा अभिनीत “थप्पड़” २८ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.

First Published on: February 11, 2020 9:09 AM
Exit mobile version