कैलाश खेर असेल तर मी येणार नाही – सोना महापात्रा

कैलाश खेर असेल तर मी येणार नाही – सोना महापात्रा

गायक सोना महिपात्रा आणि कैलास खेर

दिल्ली सरकारने आयोजित केलल्या “मयुर उत्सव”चे आमंत्रण गायिका सोना महापात्रा हिने फेटाळले आहे. या कार्यक्रमाला गायक कैलाश खेरला आमंत्रित केल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे सोनाने सांगितले आहे. #metoo मोहीमेअंतर्गत आरोप लागलेले गायक कैलाश खेरवर लैंगिक शौषणाचे आरोप करण्यात आले होते. दिल्ली सरकारने कैलाश खेरला कार्यक्रमात गाणे गायला बोलावले असल्याच्या बातमीने सोनाला धक्का बसला आहे. कैलाश खेरचा परफॉमन्स रद्द करावा अशी मागणी सोनाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना केली आहे. ट्विटरवरून तिने ही मागणी केली आहे.

कैलाश खेर विरोधात आरोप

अभिनेत्री तनुश्री दत्ता नंतर अनेक अभिनेत्रींनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. यामध्ये प्रसिद्ध गायक कैलाश खेरवरही आरोप केले होते. ट्विटरच्या माध्यमातून महिला पत्रकाराने हे आरोप केले होते. कैलाश खेर आणि मॉडेल जुल्फी विरोधात आरोप करण्यात आले होते.

 

First Published on: December 15, 2018 10:38 AM
Exit mobile version