‘अप्सरेची प्रतिमा न पुसता हिरकणीची प्रतिमा तयार करायची आहे’

‘अप्सरेची प्रतिमा न पुसता हिरकणीची प्रतिमा तयार करायची आहे’

1. हिरकणीच्या निमित्ताने तुझी अप्सरा असलेली ओळख बदलेल का?
– माझी इतके वर्ष अप्सरा असलेली ओळख आता बदलावी अशी माझी इच्छा आहे. प्रत्येक कलाकार दोन गोष्टींसाठी नेहमी धटत असतं एकतर आपली प्रतिमा आणि अस्तित्व निर्माण करण्यासाठी. पण एकदा एखादी प्रतिमा तयारी झाली तर ती प्रतिमा मोडून दुसरी प्रतिमा तयार करताना खूप त्रास होतो. एक रेष जर आपण मारली असेल तर ती रेष न पुसता त्याचा बाजूला आपल्याला एक मोठी रेष मारावी लागते. कारण अप्सेरीची प्रतिमा तयार करतानाही मी खूप मेहनत घेतली होती. त्यामुळे आता अप्सरेच्या प्रतिमेला कुठेही धक्का न लागता मला आता दुसरी प्रतिमा बनवायची आहे. माझी हिरकणीची भुमिका प्रेक्षकांना आवडली तरच माझी ही इच्छा पुर्ण होणार आहे.

२. ‘हिरकणी’ची भुमिका सोनालीने का स्विकारली?
मला खूप मनापासून असं वाटतं हिरकणीची भुमिका माझ्या वाट्याला येणं हा एक नशीबाचा भाग आहे. मी ‘अजिंठा’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. त्या चित्रपटातही अशाच प्रकारची भुमिका होती. हिरकणी ही गोष्ट आपण लहानपणी पाठ्यपुस्तकात वाचलेली आहे. या पलिकडे आपल्याकडे त्याविषयी माहिती नाहीये. लेखक प्रताप गंगावणे यांनी मला अंजिठा चित्रपटाच्या शुटींग दरम्यान हिरकणी ची गोष्ट चित्रपट स्वरूपात यावी आणि हिरकणीची भुमिका तू साकारावीस असं सुचवलं. पण मधल्या काळात ती कल्पना राहून गेली. पण तूला कळणार नाही च्या सेटवर पुन्हा एकदा प्रताप गंगावणे यांनी मला याविषयी आठवण करून दिली. त्यानंतर मी ठरवलं आता आपण ही कल्पना पुढे न्यायची. त्यावेळी माझ्या डोक्यात प्रसाद ओक हे नाव आलं. मी गोष्ट प्रसाद दादाला ऐकवली. त्यानंतर चार पानांच्या गोष्टीवर एकदी कमी वेळात चिन्मय मांडलेकरांनी हिरकणीची संहिता लिहीली आणि हिरकणीचा प्रवास सुरू झाला.

३. हिरकणी या भुमिकेचा प्रवास तुझ्यासाठी कसा होता?
– चित्रीकरणा आधी आम्ही रायगडावर जाऊन आलो. रायगडावर रहात असलेल्या हिरकणीची पार्श्वभूमी काय असेल, ती गौळण होती तर मग ती दिवसातून दोनदा रायगडावर ये जा करत असेल तर तीची शरिरयष्टी कशी असेल. मग मी व्यायाम करायला सुरूवात केली. पाच किलो वजन कमी केलं. त्यानंतर भाषेवर काम सुरू केलं. मावळ भाषा वापरली आहे आम्ही चित्रपटात. हिरकणीचा नवरा हा महाराजांचा मावळा आम्ही दाखवला आहे. ज्याच्या विषयी खरतर आपल्याला काहीच माहिती नाहीये. त्यासाठी वर्षभर आम्ही चित्रपटाचं वाचन करत होतो. एखादं नाटक बसवावं त्याचप्रमाणे हा चित्रपट बसवला. हळूहळू साडी नेसून, शेण कसं सारावयाचं, भाकरी कशी करायची या सगळ्याचा सराव मी केला. त्याचप्रमाणे हिरकणीच असणारं बाळ हे चित्रपटासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे त्या लहान बाळाबरोबर जास्तीत जास्त वेळ मी घालवला. ते बाळ चित्रपटात आपलं बाळं कसं वाटले, यासाटी माझी सवय त्याला होणं गरजेचं होतं. अशापध्दतीने हिरकणी ची जोरदार तयारी झाली.

४. सोनालीच्या आयुष्यातील ‘हिरकणी’ कोण आहे?
– माझी आई ही माझ्या आयुष्यातील खरी हिरकणी आहे. माझ्या आईने माझ्यावर अपार कष्ट घेतले आहेत. ती प्रत्येकक्षणी माझ्याबरोबर आहे. भरपावसातसुध्दा ती स्कुटरवरून मला कार्यक्रम असेल तीथे सोडायला यायची. रात्री कार्यक्रम संपेपर्यंत थांबणं,मला घेऊन येणं, परत दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर आम्हाला शाळेत सोडून ती स्वत: कामावर जायची. हे सगळं तीच्यासाठी अवघड होतं कारण ती पंजाबी आहे. पंजाबवरून इथे आली आहे. माझे बाबा आर्मीमध्ये होते त्यामुळे माझं माझ्या भावाचं सगळं माझ्या आईनेच बघितलं, तीनेच वाढवलं. त्यामुळे आज जे काही मी मिळवलं आहे ते माझ्या आईमुळेच आहे. त्यामुळे आई ही माझ्या आयुष्यातील खरी हिरकणी आहे. त्याचप्रमाणे चित्रपटामागेही एक हिरकणी आहे ती म्हणजे मंजिरी ओक. कारण जेवढा सहभाग प्रसाद ओक यांचा आहे तेवढाच मोठा वाटा मंजिरी ओक यांचा आहे. कारण पडद्यामगाची हिरकणी मंजिरी आहे. चित्रपटाच्या प्रत्येक टप्प्यात तीचा खूप मोठा सहभाग आहे.

५.
तुला बारा वर्ष पुर्ण झाली आहेत या क्षेत्रात, या प्रवासाबद्दल काय सांगशील
– या क्षेत्रात मला १२ ऑक्टोबरला बारावर्षी पुर्ण झाली आहेत. त्यामुळे ऑक्टोबर महिना माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. या बारा वर्षात खूप काही शिकायला मिळालं. कारण मी कोणतेही प्रशिक्षण न घेता मी या क्षेत्रात आले होते. खूप लोकांबरोबर मी कामं केली त्यामुळे सगळ्यांकडून खूप शिकायला मिळालं. या पुढच्या टप्प्यात देखील एखादं काम सुरू करताना कोरी पाटी घेऊन काम सुरू करणार आणि प्रत्येकाकडून काहीना काही शिकण्याचा प्रयत्न करणार. प्रत्येक माध्यमात आता काम करायचं आहे. कोणत्याही माध्यमात काम करण्याची तयारी माझी आहे.

First Published on: October 13, 2019 8:21 AM
Exit mobile version