सोनाली कुलकर्णी देणार लवकरच गुडन्यूज ?

सोनाली कुलकर्णी देणार लवकरच गुडन्यूज ?

नटरंग फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचे अनेक चाहते आहे. ती कायमचं तिच्या सौंदर्याने आणि नृत्याने तिच्या चाहत्यांना घायाळ करत असते. सोनाली कुलकर्णीने मराठीमध्ये अनेक प्रसिद्ध अशा चित्रपटामध्ये काम केले आहे. ती तिच्या अभिनयातून कायमच सर्वांच्या चर्चेचा विषय ठरत असते. पण आता मात्र सोनाली लवकरच गुडन्यूज देणार आहे का ? या कारणावरून सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली आहे.

लॉकडाऊनमध्ये सोनाली कुलकर्णी हिने रजिस्टर पद्धतीने लग्न केले. त्यानंतर मागील वर्षी तिने कुणाल बेनोडेकरसोबत लंडनमध्ये विधिवत लग्न केले. पण आता सोनाली लवकरच आनंदाची बातमी देणार आहे का ? असे बोलले जात आहे. सोनाली कुलकर्णीने ‘पटलं तर घ्या विथ जयंती’ या टॉकशोमध्ये एक गुडन्यूज दिली आहे. सोनाली कोणालातरी फोन करून ‘आता नाही येऊ शकत, कारण गुड न्यूज आहे’ असं सांगत आहे. त्यामुळे आता सोनालीच्या घरातही पाळणा हलणार का? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.

दरम्यान, आता ही गुडन्यूज नेमकी काय आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना येत्या शुक्रवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. या कार्यक्रमामध्ये सोनालीने तिच्यासोबत घडलेले अनेक किस्से सुद्धा शेअर केले आहेत. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये दोन सोनाली कुलकर्णी आहेत. त्यामुळे सारख्याच नावावरून नेमका कसा गोंधळ उडायचा याबाबत तिने सांगितले आहे. तर तिच्या आवाजावरून सुद्धा तिला अनेकदा नाकारण्यात आले आहे, हेसुद्धा तिने यावेळी सांगितले. हा एपिसोड प्रेक्षकांना शुक्रवारी प्लॅनेट मराठी ओटीटीवर पाहता येणार आहे.

सोनाली कुलकर्णी हि नेमकी कोणती गुडन्यूज देणार आहे, असा प्रश्न तिच्या चाहत्यांसह सर्वांना पडलेला असतानाच सर्वांकडून अनेक मजेशीर प्रतिक्रिया देण्यात येत आहे. सोनालीची ती बातमी व्हायरल होताच चाहत्यांकडून तिला भन्नाट प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. सोनालीचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. सोशल मीडियावर सोनाली ही नेहमीच वेगवेगळ्या कारणांवरून चर्चेत असते. इंस्टाग्रामवरही तिला फॉलो करणाऱ्यांची खूप संख्या मोठी आहे. आता तर सोनालीच्या गुड न्युजच्या बातमीनं चाहत्यांना कमालीचा आनंद झाला आहे. तिची ती बातमी खरी म्हणायची की आणखी काही याची तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

First Published on: February 1, 2023 7:58 PM
Exit mobile version