अबब! सोनम कपूरच्या ‘या’ बॅगच्या किंमतीत तुम्ही खरेदी करू शकतात अलिशान कार; बघा फोटो

अबब! सोनम कपूरच्या ‘या’ बॅगच्या किंमतीत तुम्ही खरेदी करू शकतात अलिशान कार; बघा फोटो

अबब! सोनम कपूरच्या 'या' बॅगच्या किंमतीत तुम्ही खरेदी करू शकतात अलिशान कार; बघा फोटो

बॉलिवूड विश्वात नेहमीच अभिनेत्रींच्या फॅशन, त्यांच्या ग्लॅमरसह ते वापरत असलेल्या प्रत्येक गोष्टींची चर्चा असते. अशातच बॉलिवूडची फॅशनिस्टा म्हणून सोनम कपूरची ओळख आहे. यात कोणतीही शंका नाही. सोनम बर्‍याचदा फोटोशूट्स करत असते आणि सोशल मीडियावर शेअरही करते. आता सोनम कपूरचे एक नवीन फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे, ज्यामध्ये सर्वांचे लक्ष तिचा ड्रेस आणि तिच्या बॅगवर आहे.

नुकतेच सोनम कपूरने तिचे ऑल ब्लॅक लूकमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने Louis Vuitton लेबल ब्लॅक पँट आणि ब्लॅक जॅकेटसह क्रीम बेल्ट परिधान केलेला दिसत आहे. सोनम कपूरच्या हातात Louis Vuitton या लेबलची एक बॅग दिसत आहेत.ज्यावर तिच्या फॅन्सच्या नजरा खिळल्या आहेत. तुम्हाला सोनम कपूरची ही बॅग जरी सामान्य दिसत असली तरी तिची किंमत ऐकून तुम्ही देखील हैराण व्हाल. कारण त्या बॅगेच्या किमतीत कोणीही आरामात एखादी अलिशान कार खरेदी करू शकेल. या Louis Vuitton बॅगची किंमत $ 5,350 म्हणजेच साधारण 4 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

सोनमच्या प्रोजेक्टबद्दल सांगायचे झाले कर तिने शेवटचे नेटफ्लिक्स फिल्म AK vs AK मध्ये दिसली होती. या चित्रपटात अनुराग कश्यप, अनिल कपूर आणि हर्षवर्धन कपूर होते. यासह थिएटरमध्ये सोनम कपूरचा शेवटचा चित्रपट होता तो म्हणजे झोया फॅक्टर. या चित्रपटात तिने साऊथ स्टार सलमानबरोबर काम केले होते. झोया फॅक्टर प्रेक्षकांना फारसा पसंत नव्हता आणि तो फ्लॉप देखील होता. असे सांगितले जाते की, सोनम कपूर आता ब्लाइंड नावाच्या चित्रपटात दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार, हा त्याच नावाच्या कोरियन चित्रपटाचा रिमेक आहे. चित्रपटाची कथा एका अंध पोलिस अधिकाऱ्यावर आधारित आहे जो सिरियल किलरचा शोध घेताना दिसणार आहे.


‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेच्या शुटींगला लवकरच होणार सुरुवात
First Published on: June 29, 2021 2:54 PM
Exit mobile version