नागपुर ते हैदराबाद एयरलिफ्ट केलेल्या कोरोनारुग्ण भारतीच्या निधनानंतर सोनू सुदने व्यक्त केलं दुख:

नागपुर ते हैदराबाद एयरलिफ्ट केलेल्या कोरोनारुग्ण भारतीच्या निधनानंतर सोनू सुदने व्यक्त केलं दुख:

नागपुर ते हैदराबाद एयरलिफ्ट केलेल्या कोरोनारुग्ण भारतीच्या निधनानंतर सोनू सुदने व्यक्त केलं दुख:

कोरोना व्हायरसचं संकट एकीकडे राज्यात आणि देशात कायम असताना दुसरीकडे चर्चेत असणारी गोष्ट म्हणजे अभिनेता सोनू सूद अडकलेल्या मजूरांना करत असलेली मदत. हजारो मजूरांना त्यांच्या गावी पाठवण्याचं काम तसेच लोकांना आवश्यक सोयी सुविधा,रुग्णालय,ऑक्सीजनबेड्स उपलब्ध करून देण्याचे काम सोनू सूद कोरोनाचं संकट ओढवल्यापासून करत आहे. सोशल मीडियापासून समाजातल्या सर्वच स्तरांमधून सोनू सूदवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ऑक्सिजन कंसट्रेटर्स पासून ते कोरोना रुग्णांना हवाईसेवा मार्गे रुग्णालयात दाखल करण्याचे काम सोनू सुद न थकता करत आहे.काही दिवसांपूर्वी अभिनेता सोनू सुद याने एका 25 वर्षाच्या मुलीला नागपुर ते हैदराबाद एयर अॅम्बुलंन्सने रुग्णालयात दाखल केले होते. आणि आता सोनू सुदने  ट्विट करत भारतीचे  निधन झाले असल्याची  दुख: द माहिती दिली आहे. सोनूने ट्विट करत लिहलं आहे की, ” भारती, एक तरुण 25 वर्षाची मुलीगी तिला मी नागपुर ते हैदराबाद एयर अॅम्बुलंन्सने रुग्णालयात दाखल केले होते. भारतीचे काल रात्री निधन झालं आहे. ECMO या मशीनच्या आधारे तिने एक महिना आपल्या जगण्यासाठी धडपड केली, लढाई केली. तिच्या परिवारातील सदस्यांसाठी आणि त्या सर्व व्यक्तींसाठी मला खूप दुख: होत आहे. आयुष्य हे खूप अन्यायपूर्ण आहे. असं ट्विट करत सोनू सुदने दुख: व्यक्त केलं आहे.


हे हि वाचा – सलमान कठीण काळात पुन्हा फिल्म इंडस्ट्रीच्या पाठीशी, 25 हजार कर्मचार्‍यांना कोट्यावधींची मदत

 

First Published on: May 8, 2021 3:40 PM
Exit mobile version