Coronavirus: सोनू सूदची कोरोनावर मात, अहवाल निगेटिव्ह

Coronavirus: सोनू सूदची कोरोनावर मात, अहवाल निगेटिव्ह

Coronavirus: सोनू सूदची कोरोनावर मात, अहवाल निगेटिव्ह

देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका अनेक बॉलिवूड कलाकारांना बसला आहे. यामध्ये लॉकडाऊन काळात अनेकांसाठी देवासारखा धावू आलेला अभिनेता सोनू सूदला देखील कोरोनाचा संसर्ग झाला होता. आता सोनू सूदने कोरोनावर मात केली असून त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. याबाबत सोनूने ट्वीट करत माहिती दिली आहे.

१७ एप्रिलला सोनू सूदने ट्वीट करून आपण पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली होती. त्यानंतर सात दिवसांनंतर आता सोनू सूदचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. जेव्हा सोनू सूद पॉझिटिव्ह आला होता, तेव्हा त्याने असे ट्वीट केले होते की, ‘माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी स्वतः क्वारंटाईन झालो आहे. चिंता करण्याची गरज नाही आहे. उलट तुमच्या समस्या सोडवण्यासाठी आता माझ्याकडे जास्त वेळ असेल. कोणत्याही परिस्थितीत मी तुमच्या सोबत आहे, लक्षात ठेवा.’

दरम्यान सोनू सूदने लॉकडाऊनच्या काळात अनेक गोष्टींची मदत केली. अजूनही सोनू तितकीच मदत करत आहे. कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला हातभार लावण्यासाठी देखील लसीकरण मोहीमे सुरू आहे. या मोहिमेला सोनूने ‘संजीवनी’ असे नाव दिले आहे. यासंदर्भात देखील सोनू सूदने ट्वीर करून सांगितले होते की, मी कोरोनाची लस घेतली आहे. आता देशातील इतरांनी देखील लसीकरण करावे. आम्ही संजवनी नावाची लसीकरणाची सर्वात मोठी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमुळे लोकांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती निर्माण होईल. त्यामुळे ही मोहीम लस घेण्यासाठी लोकांना प्रवृत्त करेल.


हेही वाचा – अजयचा ओटीटीवर धूमाकूळ, ‘भुज: द प्राईड ऑफ इंडिया’ चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला


 

First Published on: April 23, 2021 5:25 PM
Exit mobile version