‘जुळता जुळता जुळतंय की’ मध्ये लगीनघाई!

‘जुळता जुळता जुळतंय की’ मध्ये लगीनघाई!

मालिकेत बस्ता बांधताना

‘जुळता जुळता जुळतंय की’ मध्ये विजय-अपूर्वाच्या लग्नाचा बस्ता बांधला जाणार आहे. सोनी मराठीवर ही मालिका दाखवली जात असून यामध्ये रंकाळ्यावर विजयने अपूर्वाला प्रपोज केल्यानंतर मिळालेला होकार आता पुढच्या टप्प्यात पोहोचला आहे. प्रत्येकाची मनं सांभाळतं, बऱ्याच अडचणींचा सामना करत अखेर एकमेकांच्या गळ्यात माळ घालण्याचा निर्णय झाला आहे. लग्नाच्या दिशेने पहिलं पाऊलं लवकरच पडणार आहे आणि ते म्हणजे बस्ता बांधणीचं विजय-अपूर्वाच्या बस्ता बांधणीला मित्रमंडळी आणि विजयचे नातेवाईक हजर असणार आहेत.

बस्त्याच्या तयारीत मालिकेतील कुटुंबिय 

लग्न… दोन जीवांबरोबरच दोन कुटुंबांचं मिलन…, या सोहळ्या दरम्यान होणाऱ्या छोट्या-छोट्या गोड गोष्टींनी हा सोहळा परिपूर्ण होतो. पूर्वी लग्नाची तारीख ठरली की बस्ता बांधणीची तयारी सुरू केली जायची. इथे वधू-वरांच्या कपड्यांपासून मानपानाच्या साड्यांचा ओढा वधूपित्याला ओढावा लागायचा. मात्र गेल्या काही वर्षात या प्रथेत बदल झाला आहे. लग्नसोहळ्याची मजा लुटण्याच्या हेतूने दोन्ही कुटूंब एकत्र येतात आणि लग्नाआधीच्या खरेदीचा आनंद लुटतात. अरेंज असो वा लव्ह, लग्न करून एक होणाऱ्या वधू-वरांना एकमेकांना भेटण्याची ही एक नामी संधी… त्यात दोन कुटूंब एकत्र येऊन नवरा-नवरीला चिडवण्यात येणारा आनंद काही औरच… तेव्हा या प्रथेला सहसा कुणी नाही म्हणताना दिसत नाही. मात्र जुळता जुळता जुळतयं की मध्ये ही सर्व धमालमस्ती पाहायला मिळणार आहे.

वाचा : सुपर डान्सरच्या मंचावर ‘माऊली’ची होणार सुपर एण्ट्री!

वाचा : विवाह सोहळा विस्तारतोय

First Published on: December 20, 2018 2:23 PM
Exit mobile version