सोशल मीडियावरील ट्रोलींगनंतर सोनी टिव्हीचा माफीनामा!

सोशल मीडियावरील ट्रोलींगनंतर सोनी टिव्हीचा माफीनामा!

'KBC13'मध्ये सहभागासाठी या 3 गोष्टी गरजेच्या, जाणून घ्या कसे पोहोचाल हॉट सीटवर ?

सोशलमिडियावर सध्या बिग बी अमिताभ बच्चन यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केले जात आहे. कौन बनेगा करोडपती-११’ या टीव्ही शोचे सूत्रसंचालनादरम्यान अमिताभ यांनी एका प्रश्नाच्या उत्तरांच्या पर्यायात छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला होता. यामुळे अमिताभ बच्चन आणि कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाला बायकोट करावे आणि वाहिनीने माफी मागावी या मागणीने जोर धरला. अखेर वाहिनीने ऑफिशअल ट्वीट करत माफी मागितली आहे.

‘बुधवारी केबीसी भागातीत अज्ञानामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा संदर्भ वापरला याबद्दल आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करतो’ हे ट्वीट करत सोनी टिव्हीने दिलगिरी व्यक्त केली आहे.

 नेमकं काय घडलं?

अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपती सुरू असताना स्पर्धकाला मुघल बादशाह औरंगजेबाबाबत प्रश्न विचारण्यात आला. मुघल बादशाह औरंगजेब याच्या समकालीन खालीलपैकी कोण होते? असा प्रश्न स्पर्धकासाठी स्क्रीनवर आला. या प्रश्नाचे ४ पर्याय देण्यात आले होते. त्या ४ पर्यायांमध्ये महाराणा प्रताप, राणा सांगा, महाराजा रणजीत सिंह आणि छत्रपती शिवाजी महाराज असे पर्याय देण्यात आले होते. डी या पर्यायात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करण्यात आला होता. अमिताभ यांनी देखील पर्याय सांगताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा एकेरीच उल्लेख केला. विशेष म्हणजे प्रश्नात औरंगजेब याचा सम्राट असा उल्लेख करण्यात आला होता. या मुळे लोकांमध्ये नाराजी पसरली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याळे महाराष्ट्रातील शिवप्रेमी अतिशय नाराज झाले आहेत. याचे तिव्र पडसाद सोशल मीडियावर उमटलेले दिसले.

नेटिझन्स भडकले

First Published on: November 8, 2019 1:49 PM
Exit mobile version