ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना यंदाचा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर

ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना यंदाचा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर

अभिनेते रजणीकांत यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना यंदाचा सर्वोच्च समजला जाणारा दादासाहेब पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज पत्रकार परिषद घेत या पुरस्काराची घोषणा केली. यंदाचा ५१ वा दादासाहेब फाळके पुरस्कार ३ मे २०२१ रोजी रजनीकांत यांना देत गौरव करण्यात येणार आहे.

यावेळी बोलताना जावडेकर म्हणाले, यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार महानायक रजनीकांत यांनी घोषित करताना आनंद होत आहे. चित्रपटसृष्टीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या कलाकारास दरवर्षी दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित होतो. यंदाही हा पुरस्कार कोणाला द्यायचा यासाठी समिती नेमण्यात आली होती. या समितीमध्ये ज्येष्ठ संगीतकार आशा भोसले, मोहनलाल, विश्वजीत चटर्जी, शंकर महादेवन, सुभाष घाई यांचा समावेश होता. या समितीने एकमताने महाननायक रजनीकांत यांना पुरस्कार देण्याची शिफारस केली. त्यामुळे रजनीकांत यांच्या नावाने पुरस्कार घोषित करण्यात आला. गेल्या ५० वर्षाहून अधिक काळ अभिनेते रजनीकांत सिनेसृष्टीत तेजस्वी सूर्यसारखे चमकत आहेत. प्रतिभाशक्ती, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर आज रजनीकांत यांनी लोकांच्या मनात घर केले. त्यांमुळे त्यांना हा पुरस्कार देत योग्य गौरव केला जात आहे. असे जावडेकर म्हणाले.

सिनेसृष्टीतील दादासाहेब फाळके पुरस्कार यासाठी महत्वाचा आहे, कारण भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिला सिनेमा ‘राजा हरिशचंद्र’ हा १९१३ म्हणजे १०८ वर्षापूर्वी तयार झाला होता. या चित्रपटामुळे दादासाहेब फाळके यांना चित्रपट महर्षी म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या मृत्यू पश्चात हा पुरस्कार दिला जातो. आजपर्यंत ५० वर्षापासून हा पुरस्कार दिला जात आहे. यंदाचे हे ५१ वे वर्ष आहे. असेही जावडेकर म्हणाले.


 

First Published on: April 1, 2021 10:44 AM
Exit mobile version