बाळूमामाच्या दिव्य अवताराची होणार प्रचिती

बाळूमामाच्या दिव्य अवताराची होणार प्रचिती

बाळूमामाच्या दिव्य अवताराची होणार प्रचिती

‘कलर्स मराठी’वर ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेने अल्पावधीतच चांगलेच यश मिळवले आहे. या मालिकेतील बाळूमामा महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले आहेत. बाळूमामांच्या जीवनचरित्रावरावर ही मालिका साकारली गेली आहे. या मालिकेत रोज आकर्षक अशा घटना घडत असतात. या मालिकेत गावचा सरपंच म्हणजे पंच, त्याची पत्नी सुंदरा आणि देवाप्पा सारखे भन्नाट पात्रे आहेत. पंचचा मलप्पा नावाचा भाऊ आहे. या भावाशी त्याचे कधीच जमत नाही. या मलप्पाला बाळूमामाच्या दिव्य अवताराची प्रचिती होते आणि तो बाळूमामाचा भक्त बनतो.

‘अशी’ होते दिव्य अवतराची प्रचिती

पंचाचे आपला भाऊ मलप्पासोबत अजिबात जमत नाही. पंचाने मलप्पाच्या मुलीच्या लग्नासाठी मदत करायला नकार दिला. त्यामुळे मलप्पा फार चिंताग्रस्त होता. परंतु, अशावेळी बाळूने त्याला मदत केली. तो शिव शंकराचा भक्त आहे. त्याने शिवाची केलेली पूजा आणि अभिषेक बाळूपर्यंत पोहचतो. त्यातून बाळूच्या दिव्य अवताराचा साक्षात्कार मलप्पाला होतो. तो बाळूमामाचा भक्त बनतो.

मल्लपाची बायको आणि मुलगी देवभक्तीला त्रासले

दरम्यान, मल्लपाची बायको आणि मुलगी त्याच्या देवभक्तीला त्रासले आहेत. आता बाळू त्याच्या ह्या भक्ताला कसा मार्ग दाखवणार? लग्न कसे पार पडणार? सगळी व्यवस्था कशी होणार? बाळू भक्ताचा उध्दार कसा करणार? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. यासंदर्भात विशेष भाग कलर्स मराठीवर येत्या रविवारी प्रदर्शित होणार आहे. हा विशेष भाग दुपारी १ वाजता आणि रात्री ८ वाजता प्रदर्शित होणार आहे.

First Published on: March 28, 2019 5:26 PM
Exit mobile version