स्पृहा जोशीला मिळाली मोठी संधी! फोटो शेअर करत म्हणाली…

स्पृहा जोशीला मिळाली मोठी संधी! फोटो शेअर करत म्हणाली…

छोटा पडदा असो किंवा मोठा, आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी लोकप्रिय अभिनेत्री स्पृहा जोशी हिने मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीतही वेगळं स्थान निर्माण केलं. अभिनयासोबतच स्पृहा उत्तम कविता करते. तिच्या कविताही चाहत्यांना पसंत पडतात. ती सोशल मीडियावरही सक्रीय असते. अभिनेत्री स्पृहा जोशी नुकतीच हिंदी कलाविश्वातील एका वेबसीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकली आहे. नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये स्पृहाने आपल्या अभिनयाचा एक वेगळा ठसा उमटवला आहे.

स्पृहा जोशीने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रणनीती’ या सीरिजमध्ये लहानशी पण लक्षवेधी भूमिका साकारली आहे. यासंदर्भात अभिनेत्रीने स्वत: पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. अभिनेत्री लिहिते, “‘रणनीती’ सीरिजमध्ये साकारलेल्या लहानशा भूमिकेसाठी गेल्या काही दिवसांत जे काही कौतुक करण्यात आलं त्यासाठी मी सदैव ऋणी आहे. माझ्या भूमिकेवर भरभरून प्रेम केल्याबद्दल धन्यवाद! ‘रणनीती’ सीरिजमध्ये मी लहानशी भूमिका साकारली आहे. ही सीरिज तुम्ही जिओ सिनेमावर पाहू शकता.”

स्पृहाची ही नवीन वेब सीरिज जिओ सिनेमावर प्रदर्शित झाली आहे. ‘रणनीती : बालाकोट अँड बीयॉन्ड’ या वेब सीरिजमध्ये जिमी शेरगिल RAW एजेन्टच्या भूमिकेत आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने बालकोट सर्जिकल स्ट्राइक करत चोख उत्तर दिलं होतं. या वेब सीरिजमध्ये जिमी शेरगिल, लारा दत्ता, आशिष विद्यार्थी, आशुतोष राणा यांच्या मुख्य भूमिका आहेत.


Edited By : Nikita Shinde

First Published on: May 5, 2024 12:38 PM
Exit mobile version