‘श्रीवल्ली’चा गायक सिड श्रीराम ‘इंडियन आयडल मराठी’च्या मंचावर

‘श्रीवल्ली’चा गायक सिड श्रीराम ‘इंडियन आयडल मराठी’च्या मंचावर

'श्रीवल्ली'चा गायक सिड श्रीराम 'इंडियन आयडल मराठी'च्या मंचावर

सोनी मराठी वाहिनीवरील इंडियन आयडल मराठी हा कार्यक्रम आता रंगतदार होऊ लागला आहे. विजेतेपदासाठी सुरांची चांगलीच टक्कर बघायला मिळत आहे. श्रीवल्ली हे पुष्पा या चित्रपटातील गाणं सध्या तुफान गाजतंय. या गाण्याचा गायक हा सिड श्रीराम असून त्याने तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा भाषेत गाणी गायली आहेत. पहिल्यांदाच एका मराठी कार्यक्रमात श्रीराम गाण सादर करणार असून काही वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या युट्युब चॅनलवर अप्सरा आली या गाण्याचे कव्हर केले होते. ज्याला प्रेक्षकांची विशेष पसंती देखील मिळाली होती. आता खुद्द अजय-अतुल समोर सिडने त्यांचे गाणं सादर केले.

मराठी कार्यक्रमाचे आदरातिर्थ घेऊन आणि इंडियन आयडल मराठीच्या स्पर्धकांची गाणी ऐकून सिडसुद्धा आनंदी झाला आहे. इंडियन आयडल मराठीमध्ये सिड श्रीरामने उपस्थिती दर्शवलेला हा एपिसोड सोमवार, २८ फेब्रुवारी रोजी प्रसारित होणार आहे. मराठी कार्यक्रमात सहभागी होण्याची सिडची ही पहिलीच वेळ असल्याचे समजते.

पुष्पा चित्रपटाप्रमाणेच त्यातील गाणी आणि हुक स्पेट्स तुफान लोकप्रिय झाले आहेत. तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नडसह हिंदी भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. हिंदीमध्ये श्रीवल्ली हे गाण जावेद अली यांच्या सुमधूर आवाजात स्वरबद्ध करण्यात आले आहे. श्रीवल्ली गाण्यासोबतच पुष्पा चित्रपटातील अभिनेता अल्लू अर्जुन याचे नृत्यही सोशल मीडियावर व्हायलर झाले. त्याची खांदा उंचावून चालण्याची हुक स्टेप सामान्यांसह सेलिब्रिटींनीही फॉलो केल्याचे अनेक रिल्समध्ये पाहायला मिळाले. पुष्पा चित्रपटातील सामी.., ओ अन्टावामा.. सह श्रीवल्ली हे गाणदेखील जगभरात चांगेलच लोकप्रिय झाले आहे.


 

First Published on: February 25, 2022 7:54 PM
Exit mobile version