‘बटालियन ६०९’ मध्ये भारत – पाकच्या ४ युद्धांची गोष्ट

‘बटालियन ६०९’ मध्ये भारत – पाकच्या ४ युद्धांची गोष्ट

बटालियन ६०९ ची टीम

भारतीय चित्रपटाच्या इतिहासात पहिल्यांदा आगामी चित्रपट ‘बटालियन ६०९’ चे सानागीत क्रिकेट मैदानावर प्रकाशित करण्यात आले. हा अनोखा सोहळा लखनौच्या एकाना स्टेडीयममध्ये चित्रपट सितार्यांच्या क्रिकेट मॅच दरम्यान प्रेक्षकांच्या प्रतिसाद आणि सर्व कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला. विशेष म्हणजे असे मानले जाते की क्रिकेट आणि चित्रपट या दोन गोष्टी भारतीयांना प्रचंड आवडतात आणि त्या दोन्ही एकत्र येणे म्हणजे दुग्धशर्करा योग आहे.

सीमेवर लढणाऱ्या जवानांची गोष्ट

बटालियन ६०९ हा एक रोमहर्षक चित्रपट असून भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या ४ युद्धांची गोष्ट या चित्रपटात उलगडत जाते. या विषयाच्या पैलूतूनच आपल्या शेजारी देशासोबतच्या संबंधावर प्रकाश पडतो. प्रत्यक्ष सीमेवर लढणाऱ्या जवानांची गोष्ट आणि त्यांच्या समोरचे पेचप्रसंग आणि कुशलतेने ही परिस्थिती हाताळणे या चित्रपटात पाहायला मिळते.

पुढील वर्षात होणार प्रदर्शित

बृजेश बटुकनाथ त्रिपाठी लिखित और दिग्दर्शित बटालियन ६०९ ची निर्मिती नारायणदास लालवानी यांची आहे. संगीत शैलेंद्र सयांती यांचे असून गायक राजा सागू आहे. चित्रपटात मुख्य भूमिका शोएब इब्राहिम आणि एलेना कजान यांची असून फरनाज शेट्टी, विश्वास किणी, विककी आहुजा आणि विकास श्रीवास्तव सहकलावंत आहेत. बटालियन ६०९ येत्या ११ जानेवारी रोजी बिग कर्टेंस मीडियाद्वारे जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

First Published on: December 11, 2018 2:14 PM
Exit mobile version