फक्त महिला कलाकारांनाच चौकशीसाठी का बोलावलं?; गायिकेचा परखड सवाल

फक्त महिला कलाकारांनाच चौकशीसाठी का बोलावलं?; गायिकेचा परखड सवाल

बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शन आता हळूहळू बाहेर येऊ लागले आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्तीची एनसीबीने केलेल्या चौकशीतून बॉलीवूडमधील इतर कलाकारांचे ड्रग्ज कनेक्शन समोर आले आहे. या प्रकरणी गेल्या आठवड्यात एनसीबीने काही अभिनेत्रींना समन्स बजावले होते. त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. परंतू एनसीबीने केवळ महिला कलाकारांनाच चौकशीसाठी का बोलावले, पुरूष कलाकारांना का नाही, असा सवाल अभिनेत्री-गायिका सुचित्रा कृष्णमुर्ती यांनी केला आहे. त्यांनी ट्विट करत याबाबत मत व्यक्त केले आहेत.

काय म्हटले आहे सुचित्राने ट्विटमध्ये 

चित्रपटांमध्ये अभिनेत्रींना क्या माल है म्हटले जात आहे. आता त्याच अभिनेत्री खऱ्या आयुष्यात माल है क्या, म्हणत आहेत. सिनेक्षेत्रातील कार्यपद्धती, संस्कृतीच बदलून गेली आहे. पण मला अजूनही या गोष्टींचे आश्चर्य वाटते की कोणत्याही पुरूष कलाकाराला एनसीबीने आपल्या कार्यालयात चौकशीसाठी का नाही बोलावले, ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी कोणत्याही अभिनेत्याचे नाव समोर कसे आले नाही.

 

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक केल्यानंतर एनसीबीने दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकूल प्रीत सिंह या अभिनेत्रींना समन्स बजावले. त्यांची चौकशी करण्यात आली. तसेच करण जोहर यांच्या धर्मा प्रोडक्शनचे कार्यकारी निर्माते क्षितीज यांनाही पोलिसांनी या प्रकरणी अटक केली आहे.

 

हेही वाचा –

नारळाच्या झाडावर अडकलेल्या मांजराला वाचवण्यासाठी गेले आणि…

First Published on: September 28, 2020 1:43 PM
Exit mobile version