संजय लीला भन्साळीला बजावले समन्स

संजय लीला भन्साळीला बजावले समन्स

संजय लीला बन्साळीला बजावले समन्स

नुकतंच दिग्दर्शक संजय लीला बन्साळी यांचा ‘गंगूबाई काठीयावाडी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. बॉलीवूडचे दिग्दर्शक संजय लीला बन्साळीचे सिनेमे नेहमीच कचाट्यात सापडतात. या चित्रपटावर अनेक आरोप झाले असून, कामाठीपुरातील रहिवास्यांनी या चित्रपटातून कामाठीपुराची बदनामी केली असल्याचे आरोप केले आहे. ‘गंगूबाई काठीयावाडी’ चित्रपटाच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. या चित्रपटाला सतत विरोध होताना दिसत आहे. दरम्यान, या चित्रपटात गंगूबाईंची मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री आलिया भट्ट, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि लेखक या तिघांनाही मुंबईतील माझगाव न्यायालयाने समन्स बजावले आहे. मुंबईमधील मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी या तिघांना २१ मे रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे.

‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटातून गंगूबाईंच्या कुटूंबाची प्रतिमा मलिन केली जात आहे. अशी याचिका बाबू रावजी शाह यांनी केली आहे. बाबू रावजी शाह हे गंगूबाईंच्या मुलाचे नाव आहे. त्याने या चित्रपटात माझी आणि माझ्या कुटूंबाची बदनामी केली आहे. या चित्रपटातील सर्व गोष्टी अर्थहीन असल्याचे त्याने म्हटले आहे. बाबू रावजी शाह हे गंगूबाईंनी दत्तक घेतलेल्या चार मुलांपैकी एक आहेत. त्यांनी याचिकेत या चित्रपटाबाबत अनेक आरोप केले असून, २१ मे रोजी त्या तिघांना न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. हा चित्रपट ३० जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. संजय लीला भन्साळींच्या या सिनेमात कामाठीपुरातील महिला डॉन गंगूबाई काठियावाडीची कथा मांडली आहे. ही कथा ६० च्या दशकातील सत्य घटनेवर आधारित आहे. प्रसिद्ध लेखक हुसैन जैदी यांच्या ‘माफिया क्वींस ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित हा चित्रपट आहे.


हेही वाचा – कृषी कायदे व इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे उद्या राज्यभर उपोषण

First Published on: March 25, 2021 7:33 PM
Exit mobile version