सुप्रिया सुळे आहेत ‘या’ अभिनेत्याच्या फॅन

सुप्रिया सुळे आहेत ‘या’ अभिनेत्याच्या फॅन

राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्या जरी उत्तम राजकारणी असल्यातरी त्यांची मनोरंजनसृष्टीबाबत असलेली आवड अनेकदा पाहायला मिळते. सुप्रिया सुळे आपल्या व्यस्त कामातून वेळ काढून अनेकदा चित्रपट आणि वेब सीरिज पाहणं पसंत करतात. दरम्यान, याबाबतीत आणखी एक किस्सा समोर आला आहे. जो समजल्यावर कोणालाही आश्चर्य वाटेल.

नुकत्याच काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सुप्रिया सुळे यांना त्यांच्या आवडत्या चित्रपटाविषयी विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी ‘मिर्झापूर’ या वेब सीरिजचं नाव घेतलं शिवाय त्यातील अभिनेता पंकज त्रिपाठीच्या अभिनयाचे देखील कौतुक केले.

या वेब सीरिजमध्ये कालिन भैय्या ही भूमिका साकारणाऱ्या पंकज त्रिपाठींचा अभिनय त्यांना प्रचंड आवडला. त्यांच्या भूमिकेला पाहून त्यांनी थेट पंकज त्रिपाठीचा नंबर मिळवला आणि त्यांना थेट मॅसेज केला. त्यावेळी आपल्याशी बोलण्यासाठीचा योग्य वेळ काय? असा मॅसेज त्यांना केला होता.

 


हेही वाचा :

शाहीर शेखबाबत धक्कादायक घटना; पत्नी अन् मुलगी थोडक्यात बचावल्या

First Published on: January 26, 2023 4:09 PM
Exit mobile version