अभिनेते सुरेंद्र पाल लवकरच मराठी सिनेमात

अभिनेते सुरेंद्र पाल लवकरच मराठी सिनेमात

सुरेंद्र पाल - अभिनेता

टीव्ही मालिकेतील प्रसिद्ध अभिनेते सुरेंद्र पाल लवकरच मराठी चित्रपटांतून पदार्पण करणार आहेत. शिवदर्शन साबळे निर्मित ‘लगी तो छगी’ या मराठी चित्रपटातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यापूर्वी ‘चाणक्य’, ‘शक्तिमान’, ‘देवो के देव महादेव’ या टीव्ही मालिकांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या असून, त्यांच्या सर्व भूमिका नावाजलेल्या आहेत.

अभिनेता सुरेंद्र पाल महाभारतातील भूमिका साकारतांना  (फोटो सौजन्य- youtube)

सुरेंद्र पाल यांनी ३० वर्षांपूर्वी बी. आर. चोप्रा निर्मित ‘महाभारत’मध्ये द्रोणाचार्यांची भूमिका साकारली होती. त्यावेळी ही भूमिका खूप लोकप्रिय झाली होती. तसेच ‘चाणक्य’ मालिकेत साकारलेली अमात्य राक्षसाची भूमिका, ‘शक्तिमान’मधील तमराज किलविशची भूमिका आणि ‘देवो के देव महादेव’मध्ये केलेली दक्षाची भूमिका अगदी वाखाणण्याजोग्या अशा होत्या.
हिंदी मालिकांसोबतच त्यांनी अनेक हिंदी चित्रपटातही उत्तम भूमिका साकारल्या आहेत. आता मात्र ते पहिल्यांदाच मराठी चित्रपटातून पदार्पण करत आहेत.

शक्ताीमानमधील तमराज किलविशच्या भूमिकेतील-अभिनेता सुरेंद्र पाल (फोटो सौजन्य- google)

‘लगी तो छगी’ हा मराठी चित्रपट एकप्रकारे कॉमेडी थ्रिलर असून, या चित्रपटात सुरेंद्र पाल हे एका पठाणाची भूमिका साकारत आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिजीत साटम, निकिता गिरीधर, रविंद्र सिंग बक्षी, मिलिंद उके, योगेश सोमण, शैला कनेकर, राजू बावडेकर, सागर आठलेकर, महेश सुभेदार आणि अक्षय भोसले आदी कलाकार असणार आहेत.

First Published on: May 30, 2018 11:24 AM
Exit mobile version